Spice Crop Cultivation  Agrowon
ॲग्रो विशेष

Spice Crop Cultivation Training : ‘पंदेकृवि’त मसाला बियाणे पिकांच्या प्रशिक्षकांकरिता प्रशिक्षण

PDKV Akola : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी मसाला बियाणे पिकांचे संशोधन व क्षेत्र विस्तार करणे, या प्रकल्पाअंतर्गत सोमवारी (ता. ३) प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला.

Team Agrowon

Akola News : अकोला ः जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी मसाला बियाणे पिकांचे संशोधन व क्षेत्र विस्तार करणे, या प्रकल्पाअंतर्गत सोमवारी (ता. ३) प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला.

या प्रशिक्षण वर्गाचे उद्‍घाटन कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या अध्यक्षतेखाली झाले. याप्रसंगी संशोधन संचालक डॉ. व्ही. के. खर्चे, शिक्षण विस्तार संचालक डॉ. डी. बी. उंदीरवाडे, उद्यानविद्या अधिष्ठाता डॉ. डी. एम. पंचभाई, आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. एम. बी. इंगळे व भाजीपाला शास्त्र विभाग प्रमुख डॉ. ए. एम. सोनकांबळे यांची मुख्य उपस्थिती होती. याप्रसंगी जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील कृषी विभाग व आत्माचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

याप्रसंगी मागील चार ते पाच वर्षांपासून मसाला बियाणे (ओवा, सोप, धणे, काळेजिरे आणि कसुरी मेथी) या पिकांची लागवड करून अर्थाजन करणाऱ्या प्रत्येक तालुक्यातील दोन शेतकऱ्यांचा कुलगुरू आणि आत्मा प्रकल्प संचालकांच्या हस्ते शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच लाभार्थी शेतकऱ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात सेंद्रिय निविष्ठा प्रदान करण्यात आल्या.

तांत्रिक सत्रामध्ये डॉ. एस. एम. घावडे यांनी मसाला बियाणे पिकांचे लागवड तंत्रज्ञान विषयावर, तर डॉ. डी. एस. फड यांनी मसाले बियाण्यांच्या विविध जाती या विषयावर तर डॉ. एम. एन. इंगोले यांनी पिकांवरील रोगाचे व्यवस्थापन व डॉ. वंदना मोहोड यांनी किडींचे व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले.

मसाला बियाणे पिकांच्या लागवडीबरोबरच त्याची विक्री व विपणन यासाठी बाजार समितीचे सचिव  सुनील मालोकार यांचीही या वेळी उपस्थिती होती. त्यांनी महाराष्ट्राबाहेरील व महाराष्ट्रातील मसाला बियाणे पिकांचे विपणन आणि त्यासंबंधीची माहिती प्रशिक्षक आणि शेतकऱ्यांना दिली. सूत्रसंचालन डॉ.  घावडे यांनी केले. आभार डॉ. फड यांनी मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT