Drumstick Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Drumstick Cultivation : शेवगा लागवडीतून ग्रामविकासावर भर

सामाजिक वनीकरण, वन विभागाकडून शेवग्‍याची रोपे तयार केली जात आहेत.

Team Agrowon

Alibag News : शेवग्‍याच्या शेंगांना बाजारात मोठी मागणी असून आरोग्‍यवर्धक म्‍हणून त्‍या आवर्जून खाल्‍या जातात. शेवग्‍याच्या काही वाणापासून चांगले उत्पादन मिळवता येते.

कोकणात शेवग्‍याच्या पिकासाठी पोषक वातावरण आहे, त्याचबरोबर मुंबईसारखी मोठी बाजारपेठ जवळच असल्याने रायगड जिल्हा परिषदेकडून यंदा नऊ लाख २९ हजार २९१ इतकी शेवगा जातीची रोपे लावण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे.

मुरूड, रोहा तालुक्यातील शेतकरी शेवगा शेती करतात; मात्र, तिचे स्वरूप विस्कळित आहे. यात सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न पहिल्यांदाच शासकीय स्तरावर होत आहे.

शेतकऱ्यांना रोपे देऊन तयार होणाऱ्या शेंगा घाऊक बाजारात विकता याव्यात यासाठी जिल्हा परिषदेचे प्रयत्नशील आहे.

सामाजिक वनीकरण, वन विभागाकडून शेवग्‍याची रोपे तयार केली जात आहेत. या लागवडीतून शेतकऱ्यांना उत्पन्नात वाढ होऊन आर्थिक उन्नती साधणे शक्य होईल. शेवगा ही औषधी वनस्पती आहे.

नवजात मातांचे तसेच कुपोषण रोखण्यासाठी शेवग्‍याचा पौष्टिक आहारात समावेश केला जातो. शेवग्याच्या शेंगांना बाजारात मोठी मागणी असल्‍याने रायगड जिल्हा परिषदेतर्फे चालू आर्थिक वर्षात ग्रामीण भागात शेगवा लागवडीचा उपक्रम राबवण्यात येत आहे.

प्रत्‍येक कुटुंबाला दोन रोपे

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात प्रत्येक कुटुंबाला २ शेवग्याची रोपे याप्रमाणे ४ लाख ५४ हजार २८ कुटुंबांना ९ लाख ८ हजार ५६ रोपे पुरविण्यात येतील.

तसेच जिल्ह्यातील शाळांमध्ये १३ हजार १५ रोपे, अंगणवाड्यांमध्ये ६ हजार ५१० रोपे, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये २७०, उपकेंद्रांमध्ये १ हजार ४४० शेवग्याची रोपे लावण्यात येणार आहेत.

लागवड कुठे करावी?

शेवग्याची लागवड हलक्या, माळरान जमिनीत तसेच डोंगर उताराच्या हलक्या जमिनीही उपयुक्त ठरते. शेवग्याची लागवड सर्व प्रकारच्या जमिनीत होऊ शकत असली तरी हलका, मध्यम पाण्याचा निचरा उत्तम होणाऱ्या जमिनीत फायदेशीर ठरते.

कुपोषण रोखणे आणि आरोग्‍यवर्धक म्‍हणून शेवगा लागवडीवर भर दिला जात आहे. यातून ग्रामीण आर्थिक उन्नतीही साधता येणार आहे.
डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT