Radhakrishna Vikhe Patil agrowon
ॲग्रो विशेष

Embryo Transfer Lab : राज्यातील प्रत्येक विभागात एम्ब्रिओ ट्रान्स्फर लॅब

Radhakrishna Vikhe Patil : विभागस्तरावर एक एम्ब्रिओ ट्रान्स्फर लॅबची उभारणी केली जाणार आहे. अशी माहिती पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी (ता. २०) विधान परिषदेत दिली.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : राज्यात दुग्धोत्पादनात वाढीसाठी सरकारकडून प्रयत्न होत आहेत. त्याकरिता राज्यातील पशुपालकांना १२५ रुपये या सवलतीच्या दरात वर्गीकृत रेत मात्राचा पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यासोबतच विभागस्तरावर एक एम्ब्रिओ ट्रान्स्फर लॅबची उभारणी केली जाणार असून, याशिवाय वंशावळ सुधारणांकरिता देखील इतर उपक्रम राबविले जातील, अशी माहिती पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी (ता. २०) विधान परिषदेत दिली.

महाराष्ट्र गोजातीय प्रजनन विनियमन विधेयकावर चर्चेदरम्यान मंत्री विखे पाटील बोलत होते. विखे पाटील म्हणाले, की देशाच्या इतर भागांच्या तुलनेत महाराष्ट्राची प्रतिलिटर दूध उत्पादकता फार कमी आहे. देशी गायीची उत्पादकता विचारात घेतल्यास महाराष्ट्राची २.३४, पंजाब ९.७० तर देशाची सरासरी ३.३६ प्रतिलिटर अशी आहे.

क्रॉस ब्रिडचा विचार करता महाराष्ट्र १०.३८, पंजाब १३.३८ तर देशाची ८.५२ प्रतिलिटर प्रमाणे आहे. दुधाच्या बाबतीत म्हशीचा विचार करता महाराष्ट्राची उत्पादकता ५.३३, पंजाब ९.५६ तर देशाची सरासरी ही ५.९६ प्रतिलिटर इतकी आहे.

दरडोई दुधाच्या वापरात महाराष्ट्राची पंजाबच्या तुलनेत पिछाडी आहे. महाराष्ट्राचा दरडोई दूध वापर ११५ लिटर प्रतिवर्ष तर पंजाबचा ४६५ लिटर इतका आहे. त्यामुळेच दुग्धोत्पादनाला प्रोत्साहनाचा प्रयत्न शासन करत आहे.

महाराष्ट्र गोजातीय प्रजनन प्राधिकरण त्याकरिताच स्थापन करण्यात येत आहे. राज्यात सध्या वर्गीकृत रेतमात्रांचे पाच लाख डोज उपलब्ध आहेत. यातील एका डोजची किंमत सरासरी ४५० ते ५०० रुपये असताना शासनाकडून पशुपालकांना १२५ या सवलत दरात या डोजचा पुरवठा केला जाणार आहे.

राज्यात एम्ब्रिओ ट्रान्सफर लॅबची राज्यातील प्रत्येक विभागस्तरावर उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. राहुरी येथे बुल स्टेशन उभारण्यात आले असून राज्यात पशुवैद्यकीय सेवा सक्षम करण्यावर भर राहणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

‘महानंद’चे होणार हस्तांतर

‘महानंद’चे हस्तांतर ‘एनडीडीबी’कडे करण्याचा प्रस्ताव आहे. त्या पार्श्‍वभूमीवर महानंदमधील कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती धोरण अंतिम करण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर हस्तांतराची प्रक्रिया पार पाडली जाईल, असेही विखे पाटील यांनी सांगितले.

जळगाव येथे शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी देण्यात आली आहे. त्याची प्रशासकीय कार्यवाही लवकरच सुरू होईल, असेही त्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

Farmers Protest : शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी मिळेपर्यंत हटणार नाही! भिलवडीत राजू शेट्टींचे कोरड्या कृष्णा नदीपात्रात ठिय्या आंदोलन

Banana Farmers : केळीच्या दांड्याचे वजन ठरतेय तोट्याचे; खरेदीदारांच्या मनमानीमुळे बळीराजा त्रस्त!

Drought Relief : दुष्काळी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करा; जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे कडक निर्देश

SCROLL FOR NEXT