Elephant  Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Damage : हत्तींचा धुमाकूळ; नारळ, सुपारी, केळीचे नुकसान

Elephants Damage Crop : मोर्ले (ता. दोडामार्ग) गावात पुन्हा एकदा हत्तींचा कळप दाखल झाला आहे. कळपाने गावातील नारळ, सुपारी, केळी पिकाचे मोठे नुकसान केले आहे.

Team Agrowon

Crop Damage Sindhudurg News : मोर्ले (ता. दोडामार्ग) गावात पुन्हा एकदा हत्तींचा कळप दाखल झाला आहे. कळपाने गावातील नारळ, सुपारी, केळी पिकाचे मोठे नुकसान केले आहे. हत्तींमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तिलारी परिसरात हत्तींचा वावर आहे. गेल्या काही दिवसांपासून हत्तींना जंगलातच रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. परंतु हत्ती थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. हत्तींना नैसर्गिक अधिवासात नेण्यासाठी पश्‍चिम बंगालचे विशेष पथक जूनमध्ये जिल्ह्यात दाखल होणार आहे.

परंतु तत्पूर्वीच मोर्ले (ता. दोडामार्ग) येथे गुरुवारी (ता. २५) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हत्ती दाखल झाले. या हत्तींनी गावात येताच नारळ, सुपारी आणि केळींच्या झाडांचे नुकसान सुरू केले आहे.

हत्ती हटाव मोहीम राबवावी

शेतकरी सुरेश गवस आणि प्रभाकर गवस यांच्या बागायती पिकांचे मोठे नुकसान हत्तींनी केले आहे. याशिवाय संतोष मोर्ये यांचे दगडी कुंपण देखील हत्तींनी उद्ध्वस्त केले आहे.

भरवस्तीत हत्तींकडून धुडगूस घातला जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने तातडीने हत्ती हटाव मोहीम राबवावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

GM Rice: जीएम भात वाणांमुळे पारंपरिक वाणांना धोका? सर्वोच्च न्यायालयात याचिका

Land Survey Protest : मोजण्या थांबवा, अन्यथा तीव्र आंदोलन

Koradi Power Plant : ‘कोराडी’तून सिंचनासाठी पाणी देण्याची चाचपणी

Sugarcane FRP Updates : 'बळीराजा'कडून आजपासून उसाचा अंतिम हप्ता वितरण

Livestock Care: दुष्काळ परिस्थितीत पशुधनाची काळजी

SCROLL FOR NEXT