Electricity Bill Agrowon
ॲग्रो विशेष

Electricity Bill : राज्यातील ४४ लाख शेतकऱ्यांचे वीजबिल माफ

Ajit Pawar : अजित पवार : विविध कामांचे भूमिपूजन

Team Agrowon

Nashik News : नाशिक : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांची बोलती बंद झाली आहे. आम्हीही अशी योजना सुरू करणार असल्याचे आता विरोधक सांगत आहेत. लाडक्या बहिणींच्या प्रपंचाला हातभार लावला; पण लाडका भाऊ उपाशी राहिल्याची टीका विरोधकांकडून होते. पण, त्यांच्यासाठी ४४ लाख शेतकऱ्यांचे वीजबिल माफ केल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

आमदार सरोज अहिरे यांच्या देवळाली विधानसभा मतदार संघातील विविध विकासकामांचे भूमिपूजन मंगळवारी (ता. १५) अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पवार म्हणाले, की महिला भगिनींना सक्षम करण्यासाठी लाडकी बहीण योजना आणली आणि ती अतिशय लोकप्रिय ठरली. गरिबांच्या मुलींना शिक्षणात कुठे अडथळा येऊ नये, याकरिता त्यांना शिक्षण मोफत केले. वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत देऊ केले. शेतकऱ्यांना वीजबिल माफी दिली. कांद्यावरील निर्यात बंदी उठवली.

एक रुपयात पीकविमा योजना आणली. दुधावर प्रतिलिटर ७ रुपये अनुदान देऊ केले. सरपंच, उपसरपंच, कोतवाल, पोलिस पाटील, होमगार्ड आदी सर्वांच्या मानधनात वाढ केल्याचे त्यांनी सांगितले. विकासाच्या दृष्टिकोनातून शिवराय-शाहू-फुले- आंबेडकरांचा हा महाराष्ट्र पुढील पाच वर्षांसाठी कोणाच्या हातात द्यायचा हे तुम्ही ठरवायचे आहे. विकासकामे करताना आम्ही जातीपातीचे राजकारण कधीच केले नाही. सर्वांना समान न्याय दिला. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांवर आम्ही चालत असल्याचे त्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payment: उसाचा १०० रुपये दुसरा हप्ता तातडीने जमा करा अन्यथा आंदोलन, 'स्वाभिमानी'चा कारखान्यांना इशारा

Parbhani Dam Water Update: परभणी जिल्ह्यातील लघु प्रकल्पांत ११, मध्यम प्रकल्पांत ९ टक्के पाणीसाठा

Turmeric Farmers Support: हळदीला विमा संरक्षणाने शेतकऱ्यांना दिलासा

Fertilizer Dealers Complaint: खत विक्रीत लिंकिंगचा आरोप

Women Farmers: ‘वसंधुरा’च्या महिलांकडून सायकल कोळप्याने कोळपणी

SCROLL FOR NEXT