Water Crisis Agrowon
ॲग्रो विशेष

Water Crisis : अठरा गावांची भिस्त टँकरच्या पाण्यावर

Water Shortage : भोकरदन शहरात मागील दोन ते अडीच महिन्यांपासून भीषण पाणीटंचाईने नागरिक त्रस्त झाले आहे. तालुक्यातील २५ ते ३० गावातील ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

Team Agrowon

Jalna News : भर हिवाळ्यात शहरासह तालुक्यातील अनेक भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून प्रशासनाकडून विहिरी अधिग्रहण करून टंचाईग्रस्त गावांना ४५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यातच आजघडीला हिवाळ्यातच ही स्थिती आहे तर उन्हाळ्यात काय होणार, याची चिंता सर्वांना लागली आहे.

यंदा जेमतेम पाऊस झाल्याने जवळपास सर्वच भागातील नदी, नाल्या, विहिरी, लहान, मोठे, जलसाठे, गाव तलाव कोरडेठाक पडले आहेत. शहराला पाणीपुरवठा करणारे भोकरदन तालुक्यातील सर्वात मोठे दानापूर येथील जुई मध्यम प्रकल्पही पूर्णपणे रिकामा झाला आहे.

परिणामी भोकरदन शहरात मागील दोन ते अडीच महिन्यांपासून भीषण पाणीटंचाईने नागरिक त्रस्त झाले आहे. तालुक्यातील २५ ते ३० गावातील ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. भर हिवाळ्यात हंडाभर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ नागरिकांना आली आहे. अनेकांना आर्थिक भुर्दंड सहन करून खासगी टँकरने गरज भागवावी लागत आहे.

तर शहरातील पाणीटंचाईचा फायदा उचलत काही खासगी टँकर विक्रेत्यांनी टँकरचे दर वाढविल्याचे दिसून येत आहे. शहरातील पाणीटंचाई लक्षात घेता प्रशासनाने तालुक्यातील शेलूद येथील धामणा धरणातून २५ टँकरने पाणीपुरवठा सुरू केलेला आहे.

आज रोजी शहराला दहा ते बारा दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. तर टंचाईग्रस्त ग्रामीण भागात विहिरींचे अधिग्रहण करून टँकरने तहान भागविण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

४३ टँकरने भागविली जातेय तहान

शहराला २५ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर भोकरदन तालुक्यातील अठरा टंचाईग्रस्त गावांसाठी अठरा विहिरी अधिग्रहण करून १८ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यात तपोवन, तपोवन तांडा, माळेगाव, भायडी, विरेगाव, पिंप्री, जोमाळा, गारखेडा देवी, सावखेडा, दावतपूर, नळणी/ वाडी, वालसा वडाळा, तळणी, आव्हाना, ठालेवाडी/घारेवाडी/गणेशवाडी, पळसखेडा पिंपरी या गावांचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT