Micro Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Micro Irrigation Scheme : ‘सूक्ष्म सिंचन’ची व्याप्ती वाढवण्यासाठी प्रयत्नशील

Irrigation Scheme : सूक्ष्म सिंचन योजनेचा केंद्र सरकारकडून देण्यात येणारा निधी लवकरात लवकर प्राप्त करून घेऊन त्याचे वितरण करण्यात येईल.

Team Agrowon

Mumbai News : ‘‘प्रति थेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन योजनेतील सूक्ष्म सिंचन उत्पादक, वितरक आणि शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवून या योजनेची व्याप्ती वाढविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे,’’ असे प्रतिपादन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले

‘पर ड्रॉप मोअर क्रॉप'अर्थात प्रति थेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन या योजनेतील अडचणींबाबत इरिगेशन असोसिएशन ऑफ इंडियाच्या शिष्टमंडळाने बुधवारी (ता. १०) मुंडे यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

इरिगेशन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष झुंबरलाल भंडारी, उपाध्यक्ष के. एम. महामूलकर, सचिव संदीप जवळेकर, कमलेश दास, कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मुंडे म्हणाले, ‘‘सूक्ष्म सिंचन योजनेचा केंद्र सरकारकडून देण्यात येणारा निधी लवकरात लवकर प्राप्त करून घेऊन त्याचे वितरण करण्यात येईल.

अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींमधील शेतकऱ्यांच्या पूरक अनुदानात योजनेतील नियमावलीत बदल करून उत्पन्नाची अट शिथिल करण्याबरोबरच बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत पूरक अनुदानाची कमाल मर्यादा वाढविण्यासाठी शासन सकारात्मक आहे.

महाडीबीटी पोर्टलवरील अडचणी सोडविण्यात येतील.’’ ‘‘इरिगेशन असोसिएशन ऑफ इंडियाला राज्यस्तरीय समितीमध्ये प्रतिनिधित्व देण्याबाबत वेगळा प्रस्ताव सादर करावा’’, असे आदेश मुंडे यांनी या वेळी दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payment: उसाचा १०० रुपये दुसरा हप्ता तातडीने जमा करा अन्यथा आंदोलन, 'स्वाभिमानी'चा कारखान्यांना इशारा

Parbhani Dam Water Update: परभणी जिल्ह्यातील लघु प्रकल्पांत ११, मध्यम प्रकल्पांत ९ टक्के पाणीसाठा

Turmeric Farmers Support: हळदीला विमा संरक्षणाने शेतकऱ्यांना दिलासा

Fertilizer Dealers Complaint: खत विक्रीत लिंकिंगचा आरोप

Women Farmers: ‘वसंधुरा’च्या महिलांकडून सायकल कोळप्याने कोळपणी

SCROLL FOR NEXT