Government Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Government Scheme : ‘शासकीय योजनांची जत्रा’ कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करा

'शासकीय योजनांची जत्रा’ या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : ‘शासकीय योजनांची जत्रा’ या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले.

वंदे मातरम् सभागृह येथे मुख्यमंत्री शासकीय योजना गतिमान अंमलबजावणी अभियानांतर्गत ‘शासकीय योजनांची जत्रा’ व ‘बळीराजा सर्वेक्षण’ कार्यक्रमाबाबत आयोजित बैठकीत सोमवारी (ता. ३) श्री. केंद्रेकर बोलत होते.

या वेळी जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, मुख्यमंत्री सचिवालयाचे राहुल देशपांडे आदी उपस्थित होते.

श्री. केंद्रेकर म्हणाले, की मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक स्थिती आणि शासकीय योजना याबाबत सर्वेक्षण करण्यासाठी ‘बळीराजा सर्वे ॲप’ तयार करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करून मिळालेल्या माहितीचे विश्‍लेषण करण्यात येणार आहे. सर्वेक्षणातून मिळालेल्या माहितीच्या आधारे शेतकरी बांधवांची प्रगती तसेच जीवनमान उंचावण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी मदत मिळेल.

सर्वेक्षणानंतर विश्‍लेषण करून शासनाकडे एकत्रित अहवाल सादर केला जाणार आहे. त्यामुळे सर्वेक्षण करताना गावपातळीवरील तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, या यंत्रणेपासून ते थेट जिल्हाधिकाऱ्यांनीही यामध्ये सहभाग नोंदवावा.

मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत सर्वेक्षण गतीने सुरू असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. शेतीत दुष्काळ, पाणीटंचाई तसेच नैसर्गिक संकटांचा शेतकऱ्यांना सामना करावा लागतो. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी थेट शेतीच्या बांधावर जावे.

बळीराजा सर्वेक्षणातून भविष्यातील अडचणी समजतील व त्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करता येतील. सर्वेक्षण करताना शासकीय योजनांचा लाभ तसेच सर्वेक्षण करताना अचूक सर्वेक्षण होणे गरजेचे असल्याचेही श्री. केंद्रेकर म्हणाले.

जिल्हाधिकारी श्री. पाण्डेय म्हणाले, की लाभार्थींना जलद, कमी कागदपत्रामध्ये आणि शासकीय निर्धारित शुल्कात योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

तीन दिवस सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी एकाच छताखाली एकाच ठिकाणी राहणार आहेत. यामध्ये योजनांचा लाभ मिळवून देणे, आवश्यक कागदपत्रे प्रमाणित करणे, योजनांची माहिती देणे हा मूळ उद्देश या जत्रेचा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Re-Sowing: दुबार पेरणीसाठी सरकार शेतकऱ्यांना मदत करणार, राज्य सरकारचा निर्णय, मंत्री बावनकुळेंची माहिती

Pandharpur Cycle Wari: पंढरपुरात रंगली ४ हजार सायकलस्वारांची आगळीवेगळी ‘सायकल वारी’

Kharif Sowing Delayed: पावसाच्या खंडामुळे खरिपाच्या पेरण्यांना ‘ब्रेक’

Farm Loan Waiver Scheme: लाखभर शेतकऱ्यांचा कोरा होणार ७/१२

Re Sowing Kharif: दुबार पेरणी करताना कोणती काळजी घ्यावी?

SCROLL FOR NEXT