Banana Production  Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Production : निर्यातक्षम केळी उत्पादनासाठी व्यवस्थापन महत्त्वाचे

Export Quality Banana : निर्यातक्षम केळी पीक घेताना लागवड, पाणी व खत व्यवस्थापन, दर्जेदार रोपे, नंतर रस शोषणाऱ्या किडीचे निर्मुलन आणि बागेतील स्वच्छता या बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.

Team Agrowon

Ahilyanagar News : निर्यातक्षम केळी पीक घेताना लागवड, पाणी व खत व्यवस्थापन, दर्जेदार रोपे, नंतर रस शोषणाऱ्या किडीचे निर्मुलन आणि बागेतील स्वच्छता या बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पाणी, खत व्यवस्थापनासह प्रमुख बाबींची काळजी घेतली गेली तर चांगल्या प्रकारे निर्यातक्षम केळी उत्पादन घेता येते, असे मत केळी पिकाचे अभ्यासक सतीश माने यांनी व्यक्त केले.

राशीन (ता. कर्जत) येथे ‘अॅग्रोवन’ आणि ‘रिवूलिस इरिगेशन इं. प्रा. लि’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘निर्यातक्षम केळी लागवड तंत्रज्ञान’ या विषयावर ‘अॅग्रोसंवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

केळी अभ्यासक सतीश माने, तालुका कृषी अधिकारी शीतल पाचरणे, रिवूलिस इरिगेशन इं. प्रा. लिमिटेड चे उत्तर-मध्य महाराष्ट्रचे व्यवस्थापक विजय घुगे, कंपनीचे वरिष्ठ कृषी सल्लागार शिवराज लोणाळे, अशोक लाढाणे, सतीश आकडे, रिवूलिस उत्पादनाचे राशीन येथील अधिकृत वितरक अक्षय जगताप यांची उपस्थिती होती.

सतीश माने म्हणाले, की निर्यातक्षम केळी लागवड करताना व्यवस्थापन सोबत प्रामुख्याने रोपांची क्वालिटी महत्त्वाची असते. निर्यात होणाऱ्या केळीची फळे २० ते २१ सेंटीमीटर लांबीचे, गोलाई व जाडी व्यवस्थित आणि शिरा नष्ट झालेली असावे लागते. केळी लागवडीसाठी २४ ते ३६ सेल्सियस तापमान काळ असावा लागतो.

पूर्वी केळीची दोनच हंगामात लागवड केली जायची, परंतु आता वर्षभर कधीही लागवड करता येत आहे. केळीच्या व्यवस्थापनात आठ दिवसाला नवीन पान तयार होणे गरजेचे आहे. त्यामुळे लागवड करताना हवामानाचा विचार करून लागवड करावी. त्यासाठी जमिनीची चांगली मशागत करून जमीन भुसभुशीत असावी. पाणी साठवून राहिले तर तंतुमय मुळ्यांचे नुकसान होते. त्यामुळे नैसर्गिक निचरा होण्यास मदत होईल

प्रारंभी शिवराज लोणाळे यांनी ठिबक सिंचन केळी साठी फायदेशीर आहे. कारण ठिबकच्या वापरामुळे दिले जाणारे खते व पाणी ९० टक्के उपयोगी पडते.ठिबकमुळे केळीच्या मुळांना गरजेपुरते पाणी मिळते.

झाडाच्या मुळ्या व्यवस्थित राहण्यासाठी संतुलित पाण्याची गरज असते आणि त्यासाठी दर्जेदार ठिबकही महत्त्वाचे असते. त्यामुळे निर्यातक्षम केळी लागवड करताना ठिबक निवडही महत्त्वाची असल्याचे सांगत त्यांनी रिवूलिस कंपनीच्या विविध उत्पादनाची माहिती दिली. ‘अॅग्रोवन’ अहिल्यानगरचे बातमीदार सूर्यकांत नेटके यांनी अॅग्रोवन विषयक विविध बाबीची माहिती दिली. ‘अॅग्रोवन’ सिनिअर एक्झिक्युटिव्ह सैफ शेख यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kanda Sathwan Rog: कांदा काढणीनंतर रोगांची शक्यता; शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी

Paddy Procurement Drop: रायगड जिल्ह्यात भात खरेदीत घट

Solapur DCC Bank: ‘डीसीसी’ने ओलांडला दहा हजार कोटींचा टप्पा

Onion Harvesting: कांदा वाचवण्यासाठी शेतशिवारात लगबग

Dharashiv Agriculture Loss: ऐन सुगीत ‘पूर्वमोसमी’चे धुमशान

SCROLL FOR NEXT