Goat Farming Business Agrowon
ॲग्रो विशेष

Goat Farming Business : शेळीपालन व्यवसायातून महिलांची आर्थिक भरभराट

शेळीपालन हा व्यवसाय नक्कीच महिलांना आर्थिक भरभराट देईल. तसेच शासन सर्वत्र पोहोचू शकले नाही; परंतु युवा मित्र संस्था समाजातील प्रत्येक घटकाला आज प्रगती करण्याची संधी देत आहे.

Team Agrowon

Nashik News : शेळीपालन (Goat rearing business) हा व्यवसाय नक्कीच महिलांना आर्थिक भरभराट देईल. तसेच शासन सर्वत्र पोहोचू शकले नाही; परंतु युवा मित्र संस्था समाजातील प्रत्येक घटकाला आज प्रगती करण्याची संधी देत आहे. हे काम गौरवास्पद आहे, असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी-मेंढी विकास महामंडळ व्यवस्थापकीय संचालक डॉ. शशांक कांबळे यांनी केले.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शनिवारी (ता. २५) सिन्नर येथील युवामित्र संस्था व टाटा एआयए लाईफ इन्शुरन्स यांच्या संयुक्त विद्यमाने युवा मित्र संस्थेच्या आवारात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कांबळे बोलत होते.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा नाशिकचे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम, कृषी विज्ञान केंद्र, नाशिकचे प्रमुख डॉ. नितीन ठोके, केंद्राचे विषय विशेषज्ञ डॉ. शाम पाटील, युवामित्र संस्थेच्या विश्वस्त मधुशा मालपाठक आदी उपस्थित होते.

युवामित्र संस्थेच्या कार्यकारी संचालिका मनीषा पोटे यांनी प्रास्तविक केले. संस्थेच्या महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर सुरू असलेल्या विविध कार्यक्रमांचा प्रवास आणि आशिया खंडातील महिलांची पहिली सावित्रीबाई फुले शेळीपालक प्रोड्युसर कंपनीची माहिती दिली.

सुरू असलेल्या महिला विकास उपजीविका विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील भूमिहीन व अल्पभूधारक महिला शेतकऱ्यांना शेळी पालनातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

यासह मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रमातून ग्रामीण भागातील महिलांना त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावी असे माध्यम उपलब्ध करून दिले याबाबत माहिती दिली.

कार्यक्रमात मागील तीन वर्षांपासून शेळीपालनात उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांना विविध पुरस्कारदेखील प्रदान करण्यात आले. या सर्व विजेत्यांना एक शेळी, शाल, रोपटे व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

या वेळी झालेल्या मायलेकी मेळावा व परिसंवाद कार्यक्रमादरम्यान उपस्थित महिलांना स्फूर्ती मिळण्यासाठी तसेच त्यांचा आत्मविश्वास वाढण्यासाठी समाजातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, संगीत क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आई व त्यांच्या मुली यांचा संवाद आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी उपस्थित मायलेकींनी जीवनप्रवास, अनुभव, खडतर प्रवास, प्रेरणा यावर परिसंवादात माहिती दिली. सूत्रसंचालिका सुलभा शेरताटे यांनी प्रवास उलगडला.

यांचा झाला सन्मान :

उत्कृष्ट शेळी

प्रथम पारितोषिक : सुंदराबाई रामनाथ सानप

द्वितीय पारितोषिक : सुनीता रमेश गडाख

उत्कृष्ट करडू

प्रथम पारितोषिक : वंदना सुनील शेळके

द्वितीय पारितोषिक : शांताबाई शिवाजी चौधरी

उत्कृष्ट बोकड

प्रथम पारितोषिक : लता चांगदेव कांडळकर

द्वितीय पारितोषिक : गीता गणेश राहणे

उत्कृष्ट गोठा

प्रथम पारितोषिक : सुनीता वसंत सानप

द्वितीय पारितोषिक : मंगल किशोर दिघे

सर्वोत्कृष्ट पशुपालक

मंगल भाऊसाहेब सांगळे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

Maize Excellence Center: ‘मका उत्कृष्टता केंद्र’ स्थापनेच्या प्रस्तावावर चर्चा

Jayakwadi Dam Water Released: जायकवाडी धरणातून खेर्डा प्रकल्पात पाणी पोहोचले!

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT