Agriculture Technology Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Value Addition : शेतीमालाच्या मूल्यवर्धनातूनच आर्थिक सक्षमता : डॉ. गडाख

Dr.Sharad Gadakh : तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देत शेतकऱ्यांनी वैयक्‍तिक किंवा सामूहिक स्तरावर प्रक्रिया उद्योगाची उभारणी करावी,’’ असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले.

Team Agrowon

Amravati News : ‘‘शेतीमालावर पहिल्या टप्प्यात प्रक्रिया झाली तर अशाप्रकारच्या मूल्यवर्धनातून शेतीमालाला जादा दर मिळणे शक्‍य होते. त्याकरिता कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देत शेतकऱ्यांनी वैयक्‍तिक किंवा सामूहिक स्तरावर प्रक्रिया उद्योगाची उभारणी करावी,’’ असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले.

वरुड येथील श्रमजीवी शेतकरी उत्पादक कंपनीच्या संत्रा लिलाव मंडी व प्रक्रिया केंद्राला डॉ. गडाख यांनी भेट दिली. या वेळी ते म्हणाले, ‘‘प्राथमिकस्तरावरील प्रक्रिया देखील शेतीमालाच्या मूल्यवर्धनाला पूरक ठरते. संत्र्यामध्ये फळांची टिकवणक्षमता तसेच दर्जा सुधार यासाठी ग्रेडिंग आणि वॅक्‍स कोटिंग गरजेची राहते. सुरवातीला याबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरूकता नव्हती. आता मात्र काळानुरुप शेतकऱ्यांमध्ये बदल दिसून येत आहे.

त्यांच्याकडून ग्रेडिंग, कोटिंगवर भर दिला जात आहे, ही निश्‍चितच दिलासादायक बाब आहे. भुसार मालाच्या बाबतही शेतकऱ्यांनी असाच प्रयत्न केला पाहिजे. बाजारात शेतमाल विक्रीसाठी पाठविण्यापूर्वी क्‍लिनिंग, ग्रेडिंग केल्यास अशा मालाला चांगला दर मिळतो, असा अनुभव आहे. यासाठी जास्त खर्चही करावा लागत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीमालाच्या निदान पहिल्या टप्प्यातील प्रक्रियेवर भर द्यावा.’’

या वेळी ‘श्रमजीवी’चे अध्यक्ष नीलेश मगर्दे, मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश जिचकार यांनी कंपनीच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. या वेळी सहयोगी अधिष्ठाता डॉ. देवानंद पंचभाई, डॉ. राजेंद्र गाडे उपस्थित होते.

`प्रक्रिया व विपणनाची जबाबदारी स्वीकारावी`

‘‘कृषी विद्यापीठाव्दारे विकसित तंत्रज्ञानाद्वारे संत्रा उत्पादकता वाढीला प्रोत्साहन देत श्रमजीवी नागपुरी संत्रा उत्पादक कंपनीने प्रक्रिया व विपणनाची जबाबदारी स्वीकारावी,’’ असे आवाहन डॉ. गडाख यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT