agrowon
ॲग्रो विशेष

Tomato Processing : टोमॅटो प्रक्रियेमधून आर्थिक उन्नती साधावी ः डॉ. सोनुने

कृषी विज्ञान केंद्र, खरपुडीच्या वतीने बुधवारी (ता. २७) एकदिवसीय ‘टोमॅटो प्रक्रिया व मूल्यवर्धन’ या विषयावर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.

Team Agrowon

जालना : ‘‘टोमॅटोच्या मूल्यवर्धनासाठी त्यावर प्रक्रिया करून विक्री करावी. त्यामधून आर्थिक उत्पन्न वाढवावे,’’ असा सल्ला खरपुडी कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. व्ही. सोनुने यांनी दिला.

कृषी विज्ञान केंद्र, खरपुडीच्या वतीने बुधवारी (ता. २७) एकदिवसीय ‘टोमॅटो प्रक्रिया व मूल्यवर्धन’ या विषयावर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. उद्‍घाटन प्रसंगी डॉ. सोनुने बोलत होते. या वेळी गृह विज्ञान विभागाच्या डॉ. संगीता कराळे, उद्यानविद्या विभागाचे प्रा. सुनील कळम, अन्नतंत्र विभागाचे प्रा. शशिकांत पाटील उपस्थित होते.

डॉ. सोनुने म्हणाले, ‘‘सध्या टोमॅटो बाजारात खूप कमी दरामध्ये विक्री होत आहे. उत्पादक शेतकरीही हवालदिल झाला आहे. उद्योजकांनी, ग्रामीण भागातील महिला बचत गटांच्या महिलांनी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांनी पुढाकार घेऊन टोमॅटो प्रक्रियेमधून टोमॅटो सॉस, केचप असे प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करावेत. जेणेकरून, शेतकऱ्यांना चांगला भाव मिळू शकेल आणि व्यवसाय उभा राहील. सर्व प्रकारचे तंत्रज्ञान देण्यासाठी केव्हीके सदैव शेतकऱ्यांच्या सोबत राहील.’’

प्रा. कळम यांनी टोमॅटो प्रक्रियेसाठी योग्य वाणांची निवड करण्याच्या संदर्भात शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. डॉ. कराळे यांनी टोमॅटोतील आहारातील महत्त्व आणि विविध प्रक्रियायुक्त पदार्थांची माहिती दिली. प्रशिक्षणामध्ये टोमॅटो सॉस आणि टोमॅटो केचप या दोन पदार्थांचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.

प्रा. पाटील म्हणाले, ‘‘जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर टोमॅटो प्रोसेसिंगला वाव आहे. घसरणाऱ्या दरावर प्रक्रिया उद्योग हाच उपाय आहे. शेतकऱ्यांनी छोट्या स्तरावर कृषी प्रक्रिया उद्योग सुरू केला, तर त्यामधून त्यांची आर्थिक स्थैर्यता वाढू शकते.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Early Banana Harvesting: आगाप कांदेबाग केळीची काढणी खानदेशात सुरू

Pandharpur ST Buses: आषाढी यात्रेसाठी एसटीच्या ५,५०० विशेष बसगाड्या

Coco Peat GST: बियाण्यांप्रमाणे कोकोपीटही जीएसटीमुक्त करण्यात यावे; राज्य भाजीपाला नर्सरी असोसिएशन

Collective Farming: कडूसच्या कृषी गटाकडून ‘सामूहिक शेती’

Agricultural Products GI Tag: ‘नाबार्ड’मुळे १७६ उत्पादनांवर ‘जीआय’ मानांकनाची मोहोर

SCROLL FOR NEXT