Unseasonal Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain : पूर्व विदर्भाला वादळी वाऱ्यासह पावसाचा दणका

Crop Damage : नागपूर जिल्ह्यात वीज कोसळून पाच जनावरांचा मृत्यू

Team Agrowon

Nagpur News : पूर्व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मंगळवारी (ता. ७) सायंकाळी वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे रब्बी धान पिकाचे नुकसान झाले आहे. भाजीपाला पिकांनाही याचा फटका बसला असून नागपूर जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये वीज कोसळून पाच जनावरांचा मृत्यू झाला.

गोंदिया जिल्ह्यात पहाटे चार ते साडेचारच्या सुमारास हजेरी लावलेल्या पावसाने दिवसभर विश्रांती घेतली. सायंकाळी साडेचारपर्यंत कडाक्याचे ऊन तापत होते. अशातच सायंकाळी पाचच्या सुमारास आकाशात काळेकुट्ट ढग जमले.

क्षणात पावसाच्या सरी जिल्हाभर कोसळल्या. या पावसात रब्बी हंगामातील धानाचा कडबा भिजल्या. मळणीसाठी रचून ठेवलेले बहुतेक धान ओलेचिंब झाले. तब्बल तासभर पाऊस पडला. वादळीवाऱ्यासह आलेल्या या पावसामुळे मात्र, जनजीवन विस्कळीत झाले होते.

नागपूर जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यात गाय बैल व म्हैस तर भिवापूर तालुक्यात बैल व म्हैस वीज कोसळून ठार झाली. सायंकाळी सहाच्या सुमारास नागपूरच्या काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपीट झाली. याचा फटका भाजीपाला उत्पादकांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे.

संत्रा उत्पादकांचे देखील यामुळे नुकसान झाले. जिल्ह्याच्या अनेक भागात वृक्ष उन्मळून पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. भिवापूर तालुक्यातील नांद, बेसूर, पांजरेपार, खातखेडा शिवारात देखील वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले. गडचिरोली जिल्ह्यातही पावसाची नोंद करण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफीची रक्कम येत्या दोन दिवसांत; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Political Debate: घाबरलेल्या मोदी-शहांकडून संसदेचा अपमान : खर्गे

Kharif Sowing Deficit: देशभरात खरीप पेरणीतील तूट तीन टक्क्यांखाली

Onion Procurement Controversy: परराज्यांतील निकृष्ट कांद्यामुळे खळबळ

Rain Alert: कोकण, घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता

SCROLL FOR NEXT