Mango Season Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Season : आंबा विक्रीतून एक कोटी ६३ लाखांची कमाई

Mango Sale : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावरील आंबा विक्री ई-टेंडर पद्धतीने नुकतीच करण्यात आली.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावरील आंबा विक्री ई-टेंडर पद्धतीने नुकतीच करण्यात आली. यामध्ये यंदा विद्यापीठास एक कोटी ६३ लाखांहून अधिकचा महसूल प्राप्त झाला असल्याची महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी दिली.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाला आंबा उत्पादनात वाढ व विक्री पद्धतीमध्ये केलेल्या बदलांमुळे अधिकचा महसूल प्राप्त झाला. आंबा उत्पादन वाढीसाठी प्रक्षेत्रावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आंबा बागांचे खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, तसेच किडींचे केलेले योग्य व्यवस्थापन अशा प्रकारची विशेष काळजी घेण्यात आली.

यापूर्वी २०२२ मध्ये एक कोटी २५ लाखांचा महसूल आंबा विक्रीतून विद्यापीठाला मिळाला होता. २०२३ मध्ये एक कोटीची रक्कम ओलांडता आली नाही. यावर्षी मध्यवर्ती रोपवाटिका विभाग, तसेच ‘अ’ व ‘ब’ विभागातील प्रक्षेत्रावर नव्याने ३७०० आंबा रोपांची लागवड केलेली आहे. आंबा लागवडीखालील नवीन क्षेत्रात वाढ करण्यात येणार आहे. जेणेकरून, विद्यापीठास कायमस्वरूपी महसूल प्राप्त होईल.

आंब्याला चांगली मागणी

आंब्याची विक्री व्यवस्था आपल्या हातात घेतल्यास हे उत्पन्न तीन कोटीच्या पुढे जाऊ शकते. अपुऱ्या मनुष्यबळाअभावी महात्मा फुले कृषी विद्यापीठ ही विक्री स्वतः करू शकत नाही.

मात्र यंदा आंब्याला चांगला दर मिळत असल्याने आंबा व्यापारी एक कोटीपेक्षा जास्त नफा कमावतील, असे दिसतेय. कृषी विद्यापीठातील आंब्याला लोकांत मागणीही चांगली असते, असे सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gladiolus Farming: डोंगराळ नागालॅंडमध्ये ग्लॅडिओलसची यशस्वी शेती

Fruit Farming: आपल्या फळांची प्रतिमा दुय्यम का?

Cyclone Threat: वेध चक्रीवादळांचा!

Pune Ganesh Festival: पुण्यात गणेशोत्सवाला दिमाखात प्रारंभ

Rice Crop Update: पावसाची उघडीप; भात पिके वाढीच्या अवस्थेत

SCROLL FOR NEXT