Mango Production Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Production : अचूक तंत्राद्वारे लवकर आंबा उत्पादन शक्य

Mango Cultivation : मागील हंगामात ९ शेतकऱ्यांनी गटाच्या माध्यमातून अतिघन पद्धतीने आंबा लागवड केली.

Team Agrowon

Washim News : आंब्याची योग्य अंतरावर लागवड करून वळण व छाटणी तंत्राचा अचूक वापर करीत तिसऱ्या किंवा चौथ्या वर्षांपासून चांगले उत्पादन घेणे सहज शक्य असल्याचा दावा, केव्हीकेचे उद्यानविद्या तज्ज्ञ निवृत्ती पाटील यांनी केला.

वाशीम कृषी विज्ञान केंद्रांतर्गत उद्यानविद्या विभागाच्या वतीने वाशीम जिल्ह्यात संत्रा या फळपिकासोबत आंबा या पिकाचे क्षेत्र व उत्पादन वाढीच्या दृष्टीने मागील दोन वर्षांपासून प्रयत्न व प्रोत्साहन देण्यात येत आहे.

मागील हंगामात ९ शेतकऱ्यांनी गटाच्या माध्यमातून अतिघन पद्धतीने आंबा लागवड केली. या वर्षी बरेच नवीन शेतकरी या पद्धतीने आंबा लागवड करण्यास इच्छुक आहेत. या उद्देशाने केव्हीकेच्या पुढाकाराने अतिघन आंबा लागवड तंत्रज्ञान या विषयावर ऑनलाइन पद्धतीने प्रशिक्षण घेण्यात आले.

प्रशिक्षणाच्या अध्यक्षस्थानी केव्हीकेचे प्रमुख व वारिष्‍ठ शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र काळे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून उद्यानविद्या तज्ज्ञ निवृत्ती पाटील सहभागी होते. तांत्रिक सत्रात पाटील यांनी आंबा या पिकाचे राज्यातील क्षेत्र व उत्पादकतेबद्दल माहिती देत राज्याची व देशाची उत्पादकता अत्यंत कमी असल्याचे सांगितले. कमी उत्पादकाचे मुख्य कारण लागवडीचे अंतर असल्याचे ते म्हणाले.

अध्यक्षीय मार्गदर्शनात डॉ. काळे यांनी जिल्ह्यात शेतकरी मोठ्या प्रमाणात संत्रा पिकाकडे वळत असून या पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. शेवटच्या सत्रात उपस्थित शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तज्ज्ञांच्या वतीने देण्यात आली. सूत्रसंचालन श्रीकृष्ण बावस्कर यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT