E-Sakal Agrowon
ॲग्रो विशेष

E-Sakal: मराठी वाचकांची पहिली पसंती 'ई-सकाळ'; जगात नंबर एक

ComScore Report : ‘ई-सकाळ’ने मराठी डिजिटल माध्यमांत आपले वर्चस्व सिद्ध केले असून, जगभरातील १३.५ दशलक्ष वाचकांचा विश्वास संपादन केला आहे. कॉमस्कोरच्या अहवालानुसार, हे मराठी वाचकांचे सर्वाधिक पसंतीचे डिजिटल न्यूज पोर्टल ठरले आहे.

Team Agrowon

Pune News: 'ई-सकाळ' मराठी वाचकांची पहिली पसंती ठरले आहे. केवळ राज्यातील किंवा देशातीलच नाही जगभरातील मराठी वाचकांनी 'ई-सकाळ' वर विश्वास दर्शविल्याच काॅमस्कोरमधून स्पष्ट झाले आहे. तंत्रज्ञान अन् नव्या माध्यमांचा योग्य वापर करत, ई-सकाळनं हे यश गाठलं आहे.

‘सकाळ’चे ऑनलाइन अंग असलेल्या `ई-सकाळ`ने नुकताच २५ वर्षांचा टप्पा पार केला. वाचकांना केंद्रस्थानी ठेवून आपला देदीप्यमान वारसा यशस्वीपणे पुढे घेऊन जात आहे. त्याला वाचकांचीही साथ मिळत आहे. मराठी माध्यमांमध्ये विश्वासार्ह आणि वेळेत माहीत वाचकांपर्यंत पोचविण्याची परंपरा 'ई-सकाळ'ने कायम ठेवली. प्रत्येक बातमी, अपडेट वाचकांना विश्लेषणासह 'ई-सकाळ' देत आहे. त्यामुळे वाचकांनी 'ई-सकाळ'ला जगात नंबर केले आहे. 

कॉमस्कोर हा जागतिक पातळीवर डिजिटल मीडिया विश्लेषण करणारा महत्वाचा प्लॅटफॉर्म आहे. कॉमस्कोरच्या ताज्या अहवालानुसार 'ई-सकाळ' मराठी वाचकांच्या गळ्यातील ताईत ठरले आहे. ‘ई-सकाळ’ला १३.५ दशलक्ष युनिक यूजर्सनी पसंती देऊन शिखरावर पोचवले आहे. 'ई-सकाळ' महाराष्ट्रातच नाही तर जगभरात सर्वाधिक वाचले जाणारे मराठी डिजिटल माध्यम ठरले आहे. तंत्रज्ञान अन् नव्या माध्यमांचा योग्य वापर करत, ई-सकाळनं हे यश गाठलं आहे.

सकाळ माध्यम समूहाला पत्रकारितेचा समृद्ध वारसा लाभला आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रात तब्बल ९३ वर्षांचा दाडगा अनुभव आहे. आता सकाळ माध्यम समुहाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या प्रवासालाही पाहता पाहता २५ वर्ष पूर्ण झाली. गेल्या २५ वर्षापूर्वी सुरु झालेल्या ‘ई-सकाळ’ने नुकतेच रौप्यमहोत्सवी वर्षात पाऊल टाकले आणि याच वर्षात नवा मैलाचा टप्पा गाठला.

डिजिटल युगात इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या वाढत्या वापरामुळे ऑनलाईन वाचकांची संख्या वाढत आहे. भारतीय भाषांमध्ये वाचकसंख्या झपाट्याने वाढली. मराठी वाचकही या आधुनिक डिजिटल मिडियाला मोठी पसंती देत आहेत. त्यातही विश्वासार्ह बातम्यांसाठी वाचकांनी ‘ई-सकाळ’ला प्राधान्य दिले आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loan Waiver Issue: नांदेडमध्ये किसान सभेकडून कर्जमाफी आदेशाची होळी

Record Inspection: मिथेनॉल, गूळ व्यापाऱ्यांच्या नोंदवह्यांची तपासणी

Fodder Management: कमी पावसाच्या दृष्टीने चारा नियोजन कसे कराल?

Crop Loan Issues: परभणी जिल्ह्यात १,४७७ कोटी रुपयांचे बुडीत पीककर्ज

Banana Orchard Damage: नांदोरे, पेहेमध्ये केळी बागांचे नुकसान

SCROLL FOR NEXT