E-Sakal Becomes India’s No.1 Marathi News Website! Agrowon
ॲग्रो विशेष

E-Sakal: 'ई-सकाळ' ठरले देशातील नंबर १ मराठी वेबसाईट; मराठी वाचकांची पहीली पसंती

Comscore Ranking: ई-सकाळने डिजिटल पत्रकारितेत ऐतिहासिक कामगिरी करत काॅमस्कोरच्या आकडेवारीनुसार देशातील नंबर १ मराठी वेबसाईटचा मान पटकावला आहे. मराठी वाचकांची पहिली पसंती ठरलेल्या ‘ई-सकाळ’ने १३.५ मिलियन युजर्स आणि सर्वाधिक पेजव्ह्यूज मिळवले आहेत.

Team Agrowon

Pune News : सकाळ माध्यम समुहाने डिजिटल पत्रकारितेत गरुड झेप घेतली आहे. सकाळ माध्यम समुहाच्या 'ई-सकाळ' वेबसाईटला मराठी वाचकांची पसंती कायम आहे. वाचकांच्या या पसंतीमुळेच 'ई-सकाळ' काॅमस्कोरच्या आकडेवारीनुसार देशातील नंबर एकची मराठी वेबसाईट ठरली आहे. 'ई-सकाळ' सर्वाधिक वाचले जाणार डिजिटल न्यूज पोर्टल ठरले आहे. 

काॅमस्कोरला डिजिटल माध्यम विश्वात विशेष स्थान आहे. त्यामुळेच काॅमस्कोरच्या आकडेवारीकडे सर्वांचे लक्ष असते. काॅमस्कोर सर्व न्यूज पोर्टल्सवर, वेबसाईटवर किती वाचक भेट देतात आणि किती बातम्या वाचल्या जातात याची मोजणी करते. त्या महिन्यात ज्या वेबसाईटला वाचकांची सर्वाधिक पसंती मिळते किंवा वाचक जास्त बातम्या त्या पोर्टलवर जाऊन वाचतात ती वेबसाईट काॅनस्कोरमध्ये नंबर एक ठरते.

काॅमस्कोरच्या जानेवारी महिन्यातील याच काडवेरीनुसार 'ई-सकाळ' मराठी विश्वातील नंबर एकची वेबसाईट ठरली आहे. म्हणजेच जानेवारी महिन्यात मराठी वाचकांची सर्वाधिक पंसती 'ई-सकाळ'ला मिळाली. 'ई-सकाळ'ला सर्वाधिक युजर्स आणि पेजव्ह्यूज मिळाले. 'ई-सकाळ'ला जानेवारी महिन्यात १३.५ मिलियन युजर्स मिळाले आहेत. 

सकाळ माध्यम समुहाने डिजिटल युगात पाऊल टाकत २६ जानेवारी २००० रोजी 'ई-सकाळ'ची सुरुवात केली होती. 'ई-सकाळ'ला डिजिटल युगात पाऊल ठेऊन आता २५ वर्षे झाली. आपल्या रौप्य महोत्सवी वर्षात 'ई-सकाळ'च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. सकाळ माध्यम समुह 'ई-सकाळ' सरकारनामा, गोमन्तक, साम टीव्ही, अॅग्रोवन या वेबपोर्टल्सच्या माध्यमातून मराठी डिजिटल माध्यम विश्वात आपला दबदबाव राखून आहे. 

ॲग्रोवन: ॲग्रोवन हे शेतीसाठी वाहीलेले जगातील एकमेव वृत्तपत्र आणि डिजिटल माध्यम आहे. सकाळ माध्यम समुहाने २००५ मध्ये अॅग्रोवनची सुरुवात केली. तेव्हापासून शेतकऱ्यांना शास्त्रशुध्द आणि अचूक आधुनिक शेती, हवामान, तंत्रज्ञान, बाजाराची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचवली जात आहे.

सरकारनामा : केवळ राज्यातीलच नाही तर देशातील राजकारणातील घडामोडींची प्रत्येक अपडेट सरकारनामा आपल्या वाचकांपर्यंत पोचवते. तसेच पडद्यामागच्या हालचाली आणि विश्वासार्ह विश्लेषणही जलगतीने वाचकांना सरकारनामाच्या वेबसाईवर वाचायला मिळते. 

साम टीव्ही: सकाळ माध्यम समुहाचे नूज चॅनेल असलेल्या साम टीव्हीनेही डिजिटल विश्वा आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.  केवळ व्हिडिओच नाही तर साम टीव्हीची वेबसाईट आपल्या वाचकांपर्यंत जलग आणि विश्वासार्ह ब्रेकींग न्यूज, घडामोडी आणि विश्लेषण पोचवते. 

गोमन्तक: गोव्याच्या स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर भर देणारे गोमन्तक हे सकाळचं वेब पोर्टल आहे. गोव्याच्या सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक आणि पर्यटनविषयक बातम्यांसाठी हे एक विश्वासार्ह वेब पोर्टल आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला पूरस्थितीचा आढावा; अतिरिक्त १ हजार ६०० कोटींची मदत जाहीर

Agriculture Technology: धान्य साठवणुकीतून नफ्याचे गवसले तंत्र

Cotton Import Duty: कापूस उत्पादकांच्या अस्तित्वावर घाला

Dragon Fruit Benefits: क्षेत्र वाढते, जाणीव-जागृती वाढवा

Women Empowerment: परभणीतील ग्रामीण भागात ३४ हजार एकल महिला

SCROLL FOR NEXT