Rabi Season Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Season : वऱ्हाडात रब्बी अधांतरीच जमिनीत ओलावा, प्रकल्पांत पाणीसाठा कमी

Varhad Rain update : यंदा नियमित व परतीचा पाऊस दमदार झालेला नाही. जमिनीत ओलावा, प्रकल्पांत पाणीसाठा कमी आहे. वऱ्हाडात रब्बीबाबत साशंकता वाढली आहे.

 गोपाल हागे

Akola News : यंदा नियमित व परतीचा पाऊस दमदार झालेला नाही. जमिनीत ओलावा, प्रकल्पांत पाणीसाठा कमी आहे. वऱ्हाडात रब्बीबाबत साशंकता वाढली आहे. येत्या काळात एक-दोन पाऊस झाले तर रब्बीचे भवितव्य चांगले राहू शकते. सध्यातरी हा हंगाम अधांतरीच असल्याची स्थिती आहे.

यंदा वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यांत सरासरी इतकाही पाऊस झालेला नसल्याने भूगर्भातील पाणीपातळी वाढीला फारसा फायदा झालेला नाही. शिवाय बरेच प्रकल्प संपूर्णपणे भरलेले नाही. यामुळे प्रकल्पांवरून सिंचनासाठी किती साठा मिळेल हे आता पुढील आठवड्यात होणाऱ्या नियोजनानंतरच स्पष्ट होईल.

रब्बी हंगामात हरभऱ्याची लागवड सर्वाधिक राहते. मागील काही वर्षात हा कल तयार झालेला आहे. यंदाही अशीच स्थिती राहू शकते. कमी पाण्यात येणारे हे पीक आहे. काही शेतकऱ्यांनी लागवड सुरू केली आहे. दुसरीकडे सोयाबीन पिकाचा सार्वत्रिक हंगाम आणखी काही दिवस लांबल्याने तोपर्यंत रब्बीतील पिकांसाठी जमिनीत ओलावा राहील का, हा प्रश्‍न आहे. पाण्याच्या उपलब्धतेअभावी गव्हाच्या लागवडीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

यावर्षी अकोला जिल्ह्यात सरासरीच्या २९ टक्के पाऊस कमी झालेला आहे. बुलडाण्यात हेच प्रमाण १५ टक्के कमी, तर वाशीम जिल्ह्यात १८ टक्क्यांपर्यंत आहे. कमी पावसामुळे या जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प १०० टक्के भरू शकलेले नाहीत. अकोल्यात काटेपूर्णासारखा मोठा प्रकल्प ८५ टक्क्यांच्या आत आहे. बुलडाण्यातील खडकपूर्णा प्रकल्प जेमतेम २५ टक्केही भरलेला नाही. वाण हा प्रकल्प पूर्ण भरलेला आहे. उपलब्ध साठ्यातील पाणी आधी प्यायला व नंतर सिंचनासाठी राखीव केले जाईल. त्यामुळे शेतीपिकांचे भवितव्य अधांतरीच आहे.

मोठ्या, मध्यम प्रकल्पांतील स्थिती

काटेपूर्णा- ७१.२१ दलघमी (८२.४७ टक्के), वाण - ७९.२७ दलघमी (९६.७३ टक्के), नळगंगा- ३०.५८ दलघमी (४४.११ टक्के),पेनटाकळी- ३२.०६ दलघमी (५३.४६ टक्के), खडकपूर्णा- १७.५१ दलघमी (१८.७४ टक्के)

मध्यम प्रकल्प ः निर्गुणा १०० टक्के, मोर्णा ८१.७२, उमा १००, घुंगशी बॅरेज ६३.३०, अडाण १००, सोनल १००, एकबुर्जी १००, ज्ञानगंगा ८१.२८, पलढग ४४.४७, मस १००, कोराडी ८१.३५, मन ५४.३, तोरणा ४१.५७, उतावळी ५२.२०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Khandesh Farming: खानदेशात १० टक्के क्षेत्र नापेर राहण्याची शक्यता

Farmer Leaders Clashes: कांदादर बैठकीत शेतकरी संघटनांच्या नेत्यांत खडाजंगी

Pune APMC: भुसार वस्तूंवरील शुल्कामुळे महागाईत भर पडणार

Mumbai APMC Action: मुंबई बाजार समितीत अन्न, औषध प्रशासनाची कारवाई

Monsoon 2026: मॉन्सूनची आगेकूच

SCROLL FOR NEXT