Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance Compensation : आंदोलनांमुळे पीकविमा, अतिवृष्टीची भरपाई खात्यात जमा होणे सुरू

शासनाने मंजूर केलेले १७४ कोटी रुपये ऑनलाइनच्या खोड्यामुळे अद्यापही शेतकऱ्यांना मिळाले नसल्याने तुपकरांनी ११ फेब्रुवारी रोजी आत्मदहन आंदोलन केले.

Team Agrowon

Buldana News : शेतकऱ्यांना पीकविमा (Crop Insurance) आणि अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळावी यासाठी केलेल्या आंदोलनांमुळे अखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई जमा व्हायला लागली आहे. हे आंदोलनांचे यश असल्याचा दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी केला आहे.

सोयाबीन-कापसाला दरवाढ, पीकविमा आणि अतिवृष्टीची नुकसान भरपाई यांसह इतर मागण्यांसाठी तुपकरांच्या नेतृत्वाखाली बुलडाणा येथे सहा नोव्हेंबरला विराट एल्गार मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर २४ नोव्हेंबरला जलसमाधी आंदोलनासाठी मुंबईत धडक दिली.

या आंदोलनाची दखल घेत राज्य शासनाने घेऊन अतिवृष्टीची नुकसान भरपाई म्हणून बुलडाणा जिल्ह्यासाठी १२४.२४ कोटी व वाशीम जिल्ह्यासाठी ३२.७७ कोटी असे एकूण १५७ कोटींचे पॅकेज जाहीर केले होते.

आधीचे मंजूर असे बुलडाणा जिल्ह्यासाठी एकूण १७४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. तर याच आंदोलनावेळी पीकविमा कंपनीने तातडीने १०४ कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली होती.

यांसह राज्य शासनाने बहुतांश मागण्या मान्य केल्या. ही या आंदोलनाची मोठी फलश्रृती होती. दरम्यान, शासनाने मंजूर केलेले १७४ कोटी रुपये ऑनलाइनच्या खोड्यामुळे अद्यापही शेतकऱ्यांना मिळाले नसल्याने तुपकरांनी ११ फेब्रुवारी रोजी आत्मदहन आंदोलन केले.

या आंदोलनाचा धसका घेत आंदोलनाच्या एक दिवस आधी १० फेब्रुवारी रोजी पीकविम्याचे ९ कोटी ७८ लाख शेतकऱ्यांचा खात्यात जमा करण्यात आले होते. तर आंदोलनानंतर ४२ कोटी ५९ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले.

अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईच्या रखडून पडलेल्या ऑनलाइन याद्या तयार करण्यात आल्या होत्या. परंतु त्यानंतरही १७४ कोटी रुपयांचे वितरण न झाल्याने तुपकरांनी पुन्हा पत्र देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता.

आता सदर नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील एकूण १ लाख ६२ हजार ७३ शेतकरी यासाठी पात्र आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT