Pomegranate Orchard Agrowon
ॲग्रो विशेष

Drought Condition : दुष्काळामुळे डाळिंब बागाच्या झाल्या काटक्या

Drought Update : दुष्काळी परिस्थितीमुळे तालुक्यामध्ये डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून पाण्याचे स्रोत आटल्यामुळे सध्या या डाळिंबाच्या बागा जळून त्यांच्या काटक्या झाल्या.

Team Agrowon

Mangalvedha News : दुष्काळी परिस्थितीमुळे तालुक्यामध्ये डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून पाण्याचे स्रोत आटल्यामुळे सध्या या डाळिंबाच्या बागा जळून त्यांच्या काटक्या झाल्या. या शेतकऱ्याकडे ना शासनाचे, ना राज्यकर्त्याचे लक्ष अशी परिस्थिती आहे. दुष्काळात डाळिंब उत्पादकांना दिलासा देण्याची गरज आहे.

तालुक्यात डाळिंब, सिताफळ, लिंबू, द्राक्षे, पपई, चिक्कू या फळ पिकाच्या बागाचे क्षेत्र ठिबक सिंचन पद्धती नुसार वाढले. अलिकडच्या तीन वर्षांमध्ये डाळिंब उत्पादक शेतकरी तेल्या, कुजवा, पेन बोअर, मर व इतर रोगामुळे उध्वस्त झाला. तर त्यामध्ये राहिलेल्या बागा या पाण्याचे स्रोत आटल्यामुळे जळून गेल्या. तालुक्यामध्ये मंगळवेढा, मरवडे, भोसे, बोराळे, आंधळगाव, हुलजंती, मारापूर, पाठखळ, या आठ महसूल मंडळाचा विचार करता सर्वाधिक डाळिंब उत्पादक क्षेत्र हे हुलजंती महसूल मंडळात आहे.

त्या खालोखाल मरवडे, भोसे, आंधळगाव या मंडळामध्ये डाळिंबाचे क्षेत्र आहे. शेतकऱ्यांच्या डाळिंब पिकाला असलेल्या धोक्यापासून संरक्षण मिळावे म्हणून शेतकरी दरवर्षी हवामानावर आधारित खरीप व मृग बहारमध्ये पीकविमा भरत असतात, मात्र दोन पैकी एकदाच कधीतरी पीकविमा दिला जातो.

तोही ठराविक मंडळांना. इतर मंडळामध्ये नुकसान होऊन देखील विमा कंपनी या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याच्या बाबतीत दिलासा दाखवत नाहीत. याशिवाय सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे विंधन विहिरीच्या पाण्याची पातळी खालवल्यामुळे अनेक डाळिंबाचे क्षेत्र घटले आहे. काही बागा पाण्याअभावी जळून चालल्या आहेत. काही शेतकऱ्याकडून टँकरद्वारे विकत पाणी घेऊन बागा जतन करण्याचा कल वाढला आहे. यापूर्वी फळबागा जतन करण्यासाठी टँकरने पाणी देण्यासाठी शासन अनुदान देत होते.

यंदा कमी पावसाने दुष्काळाच्या झळा बसू लागल्यामुळे फेब्रुवारी अखेरपासून डाळिंब बागा जतन करताना मोठा संघर्ष करावा. सध्या विकतचे पाणी घेऊन बागा जगवत आहेत. तीन वर्षे विमा भरून भरपाई मिळाली नाही.
धनाजी चव्हाण, भाळवणी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Seed Law: स्वतंत्र बियाणे कायदा करणार: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

Gold Market: गुंतवणुकीसाठी सोने खरेदीकडे कल

Transparency in Quality Control: ‘गुणनियंत्रणा’साठी ई-लॅब, ई-इन्स्पेक्टर

Maharashtra Heatwave: उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता

Sugarcane FRP: साखर कारखान्यांकडे ३,५०० कोटींची एफआरपी थकीत, राजू शेट्टींची माहिती, साखर आयुक्तांची घेतली भेट

SCROLL FOR NEXT