Cloudy Weather  Agrowon
ॲग्रो विशेष

Cloudy Weather : पुणे जिल्ह्यात ढग दाटले

Crop Disease Pest Control : सध्या जिल्ह्यातील अनेक भागात कधी ऊन, तर कधी ढगाळ हवामान, तर कधी थंडी अशी स्थिती आहे. त्यातच वाढीच्या व पेरणीच्या अवस्थेत असलेल्या ज्वारी पिकांवरही रोग, किडीच्या प्रादुर्भावाची शक्यता आहे.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : जिल्ह्यात शुक्रवारपासून (ता.२४) ढगाळ हवामान तयार होत आहे. याचा शेतातील विविध पिकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. ज्वारी पिकांबरोबरच विविध ठिकाणी भाजीपाला पिकांवर किडी, अळ्यांचा प्रादुर्भाव वाढीस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

सध्या जिल्ह्यातील अनेक भागात कधी ऊन, तर कधी ढगाळ हवामान, तर कधी थंडी अशी स्थिती आहे. त्यातच वाढीच्या व पेरणीच्या अवस्थेत असलेल्या ज्वारी पिकांवरही रोग, किडीच्या प्रादुर्भावाची शक्यता आहे.

यामुळे काही शेतकरी पेरणी करावी की नाही, अशा संभ्रमात आहेत. ढगाळ हवामानामुळे जोमात आलेल्या पिकांवर विविध कीडरोगांच्या प्रादुर्भावाची शक्यता आहे.

ढगाळ हवामानामुळे प्रामुख्याने कांद्यावर करपा, आकडी या रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यापासून थंडीस सुरवात झाल्याने शेतकऱ्यांनी रब्बीच्या पेरण्यांना सुरवात केली आहे.

गेल्या महिन्यात पेरणी झालेल्या ज्वारीची पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. हरभरा पिकांची पेरणी बऱ्यापैकी झाली आहे. जिल्ह्यात खरीप हंगामातील भात पिकांची वेगाने काढणी सुरू आहे. बाजरीची काढणी अंतिम टप्प्यात आहे. मका पीक काढणीच्या व कांदा पीक वाढीच्या अवस्थेत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT