Canal  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Project : निम्न दुधना प्रकल्पातून चौथे आवर्तन सुरू

पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसामुळे अनेकवेळा धरणाच्या दरवाजाद्वारे नदीत विसर्ग करण्यात आला. १ जून २०२२ पासून ३१९.१७८ दलघमी साठा झाला.

Team Agrowon

Parbhani News : जिल्ह्यातील ब्रह्मवाकडी (ता. सेलू) येथील निम्न दुधना प्रकल्पाच्या डावा आणि उजवा कालव्यद्वारे (canal) रब्बी हंगामातील (Rabi Season) पिकांसाठी चौथे पाणी आवर्तन सुरू आहे.

यंदाच्या रब्बी हंगामात प्रकल्पाच्या कालव्यद्वारे जिल्ह्यातील सेलू, मानवत, जिंतूर, परभणी तालुक्यांतील सुमारे ८ हजार हेक्टरवरील पिकांना पाणी मिळाले, अशी माहिती कार्यकारी अभियंता पी. बी. लांब यांनी दिली.

या धरणाच्या वितरण प्रणालीअंतर्गत कालवे, वितरिका, शेतचाऱ्यांची कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. ही कामे पूर्ण झाल्यास सिंचन क्षेत्रात वाढ होईल.

यंदा जिल्ह्यातील चार तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या हरभरा, गहू, ज्वारी आदी पिकांना कालव्याचे पाणी मिळाले. त्यामुळे पिकांची उत्पादकता वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा झाला, असे लांब म्हणाले.

चौथे आवर्तन २२ फेब्रुवारीपासून सोडण्यात आले. डावा कालव्यद्वारे ५१ क्युसेक आणि उजवा कालव्यद्वारे १११ क्युसेक विसर्ग सुरू आहे.

पाणी योजना तसेच उपसा सुरू आहे. त्यामुळे जलाशयातील साठ्यात घट झाली. सोमवारी (ता. २८) सकाळी धरणात ५१.७७ टक्के जिवंत साठा होता.

पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसामुळे अनेकवेळा धरणाच्या दरवाजाद्वारे नदीत विसर्ग करण्यात आला. १ जून २०२२ पासून ३१९.१७८ दलघमी साठा झाला. बाष्पीभवनामुळे ०.२०० दलघमी साठा कमी झाला. बिगर सिंचन ०.०१७८ दलघमी पाणी वापर झाला.

सांडव्याद्वारे आजवर २६२.०४४ दलघमी पाणी सोडले. डावा कालव्याद्वारे १.६३२ दलघमी आणि उजवा कालव्याद्वारे १.४६० दलघमी पाणी सोडले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation: कोकणातील १ लाख ३४ हजार शेतकऱ्यांना दिलासा; २०९ कोटी मदत मंजूर, शासन निर्णय जारी

Nashik Rain Update: नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी

Paddy Sowing: भात पेरणीची घाई करू नका

Palghar Rain Update: पावसाच्या प्रतीक्षेला अखेर विराम

Tur MSP Procurement: शेतकऱ्यांकडून तुरीची हमीभावापेक्षा कमी दरात खुल्या बाजारात विक्री?; पणनमंत्र्यांकडून महत्त्वाचा खुलासा

SCROLL FOR NEXT