Seena River Agrowon
ॲग्रो विशेष

Seena River : कोरडेठाक सीना नदी पात्र दोन तासांत भरले काठोकाठ

Latest Rain Update : सीना नदीच्या कार्यक्षेत्रात नगरसह आष्टी तालुक्यात गेल्या १० दिवसांत चांगला पाऊस झालेला असला, तरी जामखेड तालुक्यातील जवळा परिसरात कोरडेठाक असलेले सीना नदी पात्र शनिवारी (ता. ३०) दोन तासांत काठोकाठ भरले.

Team Agrowon

Nagar News : सीना नदीच्या कार्यक्षेत्रात नगरसह आष्टी तालुक्यात गेल्या १० दिवसांत चांगला पाऊस झालेला असला, तरी जामखेड तालुक्यातील जवळा परिसरात कोरडेठाक असलेले सीना नदी पात्र शनिवारी (ता. ३०) दोन तासांत काठोकाठ भरले.

सीना नदी नगर जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करते, त्या जामखेड तालुक्यातील जवळा येथे मात्र सीना नदीचे पात्र शनिवारी सकाळी ११ वाजेपर्यंत कोरडेठाक होते.

दरम्यान, शुक्रवारी जामखेडसह आष्टी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदीला आलेल्या पाण्याने जामखेड तालुक्यातील जवळा परिसरात कोरडीठाक सीना शनिवारी वाहती झाली.

दरम्यान, शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास सीना वाहती झाल्यानंतर पाणी वेगाने सीना वरील तरडगाव (ता. करमाळा) बंधाऱ्यांपर्यंत पोहोचले. तरडगाव बंधाऱ्याची काही दारे यापूर्वीच टाकलेली असल्याने बंधाऱ्यात पाणीसाठा होऊन, सीना नदीपात्र दुपारी दोनपर्यंत काठोकाठ भरले.

कोरड्या नदीपात्रात नव्याने आलेले पाणी पाहण्यासाठी जवळा, आळजापूर व तरडगाव येथील शेतकरी ठिकठिकाणी थांबले होते. या वर्षात पहिल्यांदाच आलेल्या पाण्याच्या आनंद घेतला.

पावसाअभावी गेल्या दोन महिन्यांत सीना पट्ट्यातील विहिरी कोरड्या पडल्याने, बागायती पिके धोक्यात आली होती. मात्र सीना नदीला आलेल्या पाण्याने या भागातील पिकांना जीवदान मिळाले आहे.
- राजेंद्र महाजन, शेतकरी, जवळा, ता. जामखेड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना दोन हप्ते एकदम?; मार्च, एप्रिलचा ७३० कोटी निधी मंजूर

Soybean Seed Treatment: कमी पावसाच्या संकटात सोयाबीन लागवडीपूर्वीचे नियोजन कसे करावे?

Papaya Cultivation: पपई लागवड क्षेत्र १५ हजार हेक्टरवर पोहोचण्याचा अंदाज

Agrowon Podcast: कापसातील तेजी कायम; सोयाबीनमध्ये सुधारणा, कांदा दबावातच तर हळद-हरभरा स्थिर

Water Levels Drop: उन्हामुळे जलसाठ्यात झपाट्याने घट

SCROLL FOR NEXT