Drumstick Agrowon
ॲग्रो विशेष

Drumstick Price : बारामतीत शेवग्याला उच्चांकी ३५० रुपये दर

Drumstick Market Update : बाजार समितीत सोमवारी (ता. २) शेवग्याची अवघ्या ५ क्विंटलची आवक झाली होती. त्यामुळे उच्चांकी प्रतिकिलो ३५० रुपये, सरासरी २५० रुपये प्रतिकिलो दर मिळाला, अशी माहिती बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी दिली.

Team Agrowon

Baramati News : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे जळोची भाजी मार्केटमध्ये शेवग्याची आवक कमी आहे. त्यातच मागणी वाढली आहे. बाजार समितीत सोमवारी (ता. २) शेवग्याची अवघ्या ५ क्विंटलची आवक झाली होती. त्यामुळे उच्चांकी प्रतिकिलो ३५० रुपये, सरासरी २५० रुपये प्रतिकिलो दर मिळाला, अशी माहिती बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी दिली.

चालू वर्षी मॉन्सूनोत्तर पावसामुळे फळभाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे येथील मार्केटमध्ये गवार, वांगी, मिरची, भेंडी, वाटाणा, दोडका, गाजर, दुधी भोपळा, कारले व इतर फळभाज्या आणि पालेभाज्यांना चांगले दर मिळत आहेत. त्यातच थंडीचा कडाका वाढल्याने बाजारात आवक कमी होत असल्यामुळे भाजीपाल्याचे बाजारभाव वाढले आहेत.

बाजार समितीत शेवगा खरेदी-विक्री करणारे दहा ते पंधरा आडते आहेत. बाजार समितीत शेवग्याची आवक प्रामुख्याने इंदापूर, दौंड, फलटण या भागांतून मोठ्या प्रमाणात होते. याशिवाय तालुक्यातूनही काही प्रमाणात आवक होते. साधारणपणे दररोज ५ ते १० क्विंटलची आवक येथे होत असते. मागील एक महिन्यापासून आवक कमी होत असून दरात चढउतार होत आहे. सध्या दर प्रतिकिलो २०० रुपयांच्या वर गेलेले आहेत.

त्याचबरोबर शेवग्याचे भावही तेजीत असून शेवग्याला प्रतिकिलो उच्चांकी दर मिळत आहे. जळोची मार्केटमध्ये शेवग्याची आवक प्रशांत जंजीरे, राहुल वारे, बाळासाहेब काळे व जगन्नाथ शिंदे या आडतीवर शेवग्याची आवक येत असून कर्नाटक व आंध्र प्रदेश, तमिळनाडू, गुजरात या ठिकाणांहून माल आयात केला जातो. तसेच सोलापूर जिल्ह्यातून फोंडशिरज, माळशिरज, दहिगाव, नातेपुते सातारा जिल्ह्यातून गिरवी तसेच पुणे जिल्ह्यातून उदमाईवाडी येथून शेवगा आवक येते.

राज्यात काही भागांत जसे की फोडशिरज, माळशिरज येथे शेवग्याची शेती केली जाते. शेवग्याचे भाव वाढण्याचे कारण म्हणजे मागणी वाढली आणि पुरवठा कमी हे आहे. उत्पादनात घट आणि निर्यात वाढल्याने मागणी वाढली आहे, अशी माहिती बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी दिली.

बारामतीतील जळोची येथील मार्केटमधील शेवगा आवक (क्विंटल), दर (रुपये)

तारीख आवक कमाल दर किमान दर सरासरी दर

२ डिसेंबर ५ ३५,००० २५,००० ३००००

१ डिसेंबर ५ ३०,००० १७,००० २५,०००

३० नोव्हेंबर ७ ३०,००० १८,००० २५,०००

२८ नोव्हेंबर ९ ३०,००० १६,००० २५,०००

२७ नोव्हेंबर ५ ३०,००० १५,००० २५,०००

२६ नोव्हेंबर ५ २५,००० १५,००० २०,०००

२५ नोव्हेंबर ५ २०,००० ११,००० १५,०००

दिवाळीच्या अगोदर झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे शेवगा पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पादनात घट झाली असून मागणी कायम आहे. त्यामुळे दरात वाढ झाली आहे.
सुनील पवार, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, बारामती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

Ujani Dam Water : उजनी धरणाचे आज रात्री सोळा दरवाजे उघडणार

Water Stock : सातपुड्यातील प्रकल्पांत जलसाठा वाढला

Agriculture Damage : कालवे वाहते राहिल्याने जमीन नापीक

SCROLL FOR NEXT