Drought Agrowon
ॲग्रो विशेष

Drought : खानदेशात दुष्काळ जाहीर करावा; रघुनाथदादाप्रणीत शेतकरी संघटनेची मागणी

Drought Conditions in Khandesh : खानदेशात जून व ऑगस्टमध्ये कमी पावसाने पिकांची हानी झाली. आता अतिपावसात सर्वच पिकांची हानी झाली आहे.

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशात जून व ऑगस्टमध्ये कमी पावसाने पिकांची हानी झाली. आता अतिपावसात सर्वच पिकांची हानी झाली आहे. शासनाकडून मदतनिधी, पंचनामे याबाबत स्पष्ट धोरण जाहीर झालेले नाही. शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची गरज आहे.

ही बाब लक्षात घेता सर्वत्र ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी रघुनाथदादाप्रणीत शेतकरी संघटनेच्या धुळे, जळगाव जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आदींनी केली.

सुरुवातीला दुष्काळी स्थिती होती. यात सोयाबीन, उडीद, मुगाचे मोठे नुकसान अनेक भागांत झाले. उडदाची पेरणी कमी पावसामुळे जूनमध्ये अनेक शेतकरी करू शकले नाहीत. नंतर सप्टेंबरमध्ये अतिपाऊस झाला. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, जामनेर, पारोळा, अमळनेर, जळगाव या भागांत अनेकदा अतिवृष्टी झाली. धुळ्यातही पावसाने कहर केला.

नंदुरबारातही सप्टेंबरअखेर अतिपाऊस झाला. नवापूर, नंदुरबार, शहादा, तळोदा भागात सुरुवातीला कमी पाऊस होता. पण आता काही भागांत अतिपावसात कापूस व इतर पिकांचे नुकसान झाले. यामुळे तूर वगळता इतर सर्वच पिकांना फटका बसला. पण शासनाने दुष्काळ जाहीर करून सरसकट मदत जाहीर केलेली नाही. कमी पाऊस, अधिक पाऊस, यातच शासन, प्रशासन अडकले आहे.

सत्तेतील मंडळीने नुकसानीची पाहणी केली, पण भरपाई, मदत कुणाला, कोणत्या पिकाला, केव्हा, किती दिली जाईल, हे कुण्याही सत्तेतील नेत्याने सांगितले नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. शेतकरी आश्‍वासने, बतावणीवर समाधानी नाहीत.

ठोस मदत, ठोस पंचनामे करणे आवश्यक आहे. त्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करायला हवा. कारण शेतकऱ्यांमध्ये शासनाच्या धरसोडीच्या वृत्तीबाबत नाराजी आहे, असेही संघटनेचे संदीप पाटील, किरण गुर्जर आदींनी म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Procurement: केंद्राकडून राज्यात १२ रुपये ३५ पैशानं कांद्याची खरेदी सुरु, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

Banana Cultivation: केळी लागवडीसाठी दर्जेदार कंदांच्या मागणीत वाढ

Khandesh Tur Lagwad: खानदेशात यंदा तूर लागवड स्थिर राहण्याचे संकेत

Cabbage Farming: कोबी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

SCROLL FOR NEXT