Drought Condition agrowon
ॲग्रो विशेष

Drought Condition : अमरावतीतील ७८ मंडलांत दुष्काळसदृश स्थिती जाहीर

Drought Update : खरीप हंगामात झालेल्या नुकसानीच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने उशिरा का होईना आता जिल्ह्यातील ७८ महसूल मंडलांत दुष्काळसदृश स्थिती जाहीर केली आहे.

Team Agrowon

Amravati News : खरीप हंगामात झालेल्या नुकसानीच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने उशिरा का होईना आता जिल्ह्यातील ७८ महसूल मंडलांत दुष्काळसदृश स्थिती जाहीर केली आहे. राज्यात दुष्काळ जाहीर करताना भेदभाव झाल्याच्या कल्पनेने शेतकऱ्यांमध्ये शासनाप्रती रोष निर्माण झाला होता.

जिल्ह्यातील ७८ महसूल मंडलांत दुष्काळसदृश स्थिती असल्याचे शासनाने मान्य केले आहे. या मंडलांना दुष्काळाचा पहिला ट्रीगर लागू झाला आहे. जिल्ह्यात यंदा पावसाची तूट असून चांदूरबाजार वगळता उर्वरित तालुक्यात ३१ टक्क्यांपर्यंत तूट आहे.

दर्यापूर व अंजनगावसुर्जी तालुक्यात हे प्रमाण अधिक असून ४० टक्क्यांहून अधिक पावसाची तूट आहे. सोबतच ऑगस्ट महिन्यात २१ दिवसांपेक्षा अधिक कालावधीत पावसाचा खंड राहिला आहे. त्यामुळे पहिल्या ट्रीगरनुसार जिल्ह्यात दुष्काळसदृश स्थिती जाहीर करण्याची मागणी समोर आली होती.

प्रशासनाने जाहीर केलेल्या नजरअंदाज व सुधारित पैसेवारीनुसार जिल्हा या यादीत बसण्याची शक्यता कमी होती. त्यामुळे रोष वाढत असताना शासनाने ७८ महसूल मंडलांत, अशी स्थिती असल्याचे मान्य केले आहे.

शासनाने जाहीर केलेल्या यादीनुसार अमरावती, मोर्शी, चांदूरबाजार, तिवसा, अंजनगावसुर्जी, दर्यापूर, धारणी, अचलपूर, नांदगाव खंडेश्वर, चांदूररेल्वे, वरुड, धामणगावरेल्वे व चिखलदरा या तालुक्यांतील ७८ महसूल मंडलांत दुष्काळसदृश स्थिती असल्याचे स्पष्ट झाले आहे. या मंडलांतील शेतकऱ्यांना दुष्काळाच्या सवलती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी त्या प्रत्यक्षात मिळण्याची प्रतीक्षा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Prediction: पूर्व विदर्भात ५ दिवस पावसाचा अंदाज; उद्यापासून राज्यात पावसाचे वातावणर निवळण्याची शक्यता

Unseasonal Rain Crisis: वादळी पावसाचा तिसऱ्यांदा तडाखा

Turmeric Harvest Management: हळद काढणी पश्चात व्यवस्थापनावर मार्गदर्शन

Farmer Compensation Maharashtra : राज्यात २ लाख ४ हजार हेक्टर शेतीपिकांचं नुकसान; शेतकऱ्यांना लवकरात-लवकर मदत देणार, कृषिमंत्री भरणे यांची ग्वाही

Fertilizer Stock Approved: अकोला जिल्ह्यासाठी १.१४ लाख टन खत मंजूर

SCROLL FOR NEXT