Drought Update  Agrowon
ॲग्रो विशेष

Drought Update : ‘बाहत्तर’च्या दुष्काळाची आठवण होतेय ताजी

Drought Crisis : जेमतेम हाती आलेल्या रब्बीने मोठी निराशा केली असून, कांदा भाववाढीअभावी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणत आहे.

Team Agrowon

Sakri News : साक्री तालुक्यात पाण्याअभावी शेती व्यवसाय बेभरवशाचा झाला आहे. जेमतेम हाती आलेल्या रब्बीने मोठी निराशा केली असून, कांदा भाववाढीअभावी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणत आहे.

वाढता खर्च करूनही, अपेक्षित उत्पन्न येऊनही कांदा शेतकरी सावरणार नसल्याचे चित्र आहे. १९७२ च्या दुष्काळाच्या आठवणी ताज्या करत असल्याच्या भावना जाणकार व्यक्त करीत आहेत.

अलीकडे दुष्काळसदृश परिस्थितीची सवयच बळीराजाला झाली आहे. दिवसेंदिवस शेती व्यवसायात वाढता खर्च करत शेतकरी मेटाकुटीला आला आहे. यंदा विहिरींनी ऐन पावसाळ्यातही तळ गाठला आहे.

पाण्याअभावी शेतकऱ्यांचे यंदा नियोजन बारगळणार आहे. पाणीच नसल्याने कोणतेही हमीचे पीक येणार नाही. काही ठिकाणी केवळ पाळीव जनावरांना पाणी पाजता येईल इतका वेळ वीज पंप सुरू करणे शक्य आहे. दिवस उजाडल्यावर चाऱ्यासह पाण्याचा प्रश्न डोळ्यासमोर उभा राहतो.

कोरडवाहू क्षेत्रात अधिकच भर

साक्री तालुक्यातील कोरडवाहू क्षेत्र अधिक आहे. यंदा दुष्काळामुळे त्यात अधिक भर पडली आहे. शेतकऱ्यांची आर्थिक मदार शेती व्यवसायावर अवलंबून आहे. तथापि, रोजगारासाठी दुसरा अन्य कोणताही प्रकल्प नाही. म्हणून रोजगाराचा अभाव आहे.

आदिवासी मजुरांनी यापूर्वीच स्थलांतर केले आहे. दुसऱ्या रोजगार हमी योजनेच्या कामांची भ्रांत आहे. हातमजुरी करणाऱ्यांना रोजगार हमी योजनेच्या कामांची प्रतीक्षा करावी लागत आहे. मजुरांना पुरेसे काम नसल्याने घरी बसून राहण्याची वेळ आली आहे.

शिवारात होणार पांढरे सोने दुर्मीळ

यंदा विहिरींना पाणीच नसल्याने अल्पभूधारक, गरीब शेतकऱ्यांची आर्थिक मदार असलेले पांढरे सोने (कापूस) व तूर शेतशिवारात फारसे दिसणार नाही. विहिरींच्या पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत असल्याने यंदा कापूस, तुरीच्या लागवडीसाठी शेतकरी काळजीत आहेत.

पाण्याच्या शोधासाठी विहिरीला बोअर लावणे आदी कामे केली जात आहेत; परंतु जलस्तर घटल्याने ‘आडात नाही तिथे पोहऱ्यात कुठून येणार’ अशी अवस्था आहे. गेल्या वर्षी शेतीसाठी बऱ्यापैकी पाणीसाठा उपलब्ध होता. यंदा दुष्काळाच्या झळा अधिकच तीव्र होत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT