Cabinet sub-committee meeting Agrowon
ॲग्रो विशेष

Drought condition : दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर झालेल्या १७८ तालुक्यांना काय सवलती मिळणार?

Swapnil Shinde

Government declared drought like conditions : यंदा राज्यात पावसाने पाठ फिरवल्याने हिवाळ्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. पुढील महिन्यात त्याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता असल्याने राज्य शासनाने केंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. मात्र, सर्व जिल्ह्यातून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी वाढली होती. त्यामुळे गुरुवारी मंत्रालयातील वॉर रुम येथे मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत ७५० मिमी पेक्षा कमी पाऊस पडलेल्या १७८ तालुक्यातील ९५९ महसुली मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे.

या बैठकीला उपसमितीचे अध्यक्ष व मदत, पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील,महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कृषीमंत्री धनंजय मुंडे,रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांच्यासह संबंधित विभागाचे अपर मुख्य सचिव आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

माॅन्सूनच्या पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम वाया गेल्या. तर रब्बी हंगामाच्या पेरण्यासाठी जमिनीत ओल नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. तसेच ठिकठिकाणी दुष्काळाची तीव्रता वाढली असून अनेक गावांतून पिण्याच्या पाण्याचे टॅंकर, चारा छावणीची मागणी होऊ लागली असून दुष्काळाची दाहकता वाढत आहे. अशा परिस्थितीत दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी सरकारच्यावतीने ९५१ महसुली मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. त्या भागातील लोकांना दुष्काळाच्या सर्व सवलती लागू होणार आहेत, अशी माहिती मदत, पुनवर्सन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिली.

अनिल पाटील म्हणाले की, केंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. मात्र, राज्यातील उर्वरीत तालुक्यातील काही मंडळांमध्ये असलेली पर्जन्यमानाची कमी लक्षात घेता ७५ टक्क्यांपेक्षा कमी आणि ७५० मिमी पेक्षा कमी पाऊस पडलेला आहे, असा निकष लक्षात घेऊन १७८ तालुक्यातील ९५९ महसुली मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे.

काय सवलती मिळणार ?

  • दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या जमीन महसूलात घट

  • पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती

  • कृषी पंपांच्या वीज बिलात ३३.५ टक्के सूट

  • टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेती पंपांची वीज जोडणी खंडित न करणे

  • शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शुल्कात माफी,

  • रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता

  • आवश्यक तिथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकरचा वापर

  • ८० हजार शेतकऱ्यांना देणार वैरण पिकाचे बियाणे

  • चारा छावण्यांएेवजी शेतकऱ्यांना मिळणार घरपोच मुरघास

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soymeal Export : भारतातून सोयापेंड निर्यात मागील ५ महिन्यात दुप्पट; तेलबिया पेंड निर्यात घटली

Sugar Ordinance : साखर अध्यादेश धोरणात्मक बदलात शेतकरी बेदखल, राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे मागणी

Animal Care : जनावरे का होतात लठ्ठ?

PM Aasha Yojana : कडधान्य आणि तेलबियांच्या उत्पादनाला चालना देणाऱ्या 'पीएम आशा योजने'ला केंद्राची मंजुरी

Soybean Cotton Anudan : सोयाबीन कापूस अनुदानाची कृषिमंत्री मुंडेंनी मिरवली शेखी; शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT