Agriculture Award  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Award : उत्कृष्ट कृषी संशोधनासाठी डॉ. काकडे यांना पुरस्कार

PDKV Akola : कृषी क्षेत्रात शेतकऱ्यांना तत्काळ फायदेशीर असणाऱ्या उल्लेखनीय संशोधनासाठी दरवर्षी विद्यापीठातील शास्त्रज्ञांची तज्ज्ञ निवड समितीद्वारे संशोधन सादरीकरणाच्या माध्यमातून या पुरस्कारासाठी निवड करते.

Team Agrowon

Akola News : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या बुधवारी (ता. ५) झालेल्या दीक्षान्त समारंभात २०२३-२४ चा डॉ. के. जी. जोशी उत्कृष्ट संशोधक पुरस्कार देऊन कापूस संशोधन विभागात कार्यरत सहयोगी प्राध्यापक व कापूस कृषी विद्यावेत्ता डॉ. संजय उत्तमराव काकडे यांना सन्मानित करण्यात आले.

या वेळी व्यासपीठावर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, पालकमंत्री आकाश पुंडकर, कर्नाटक कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष डॉ. अशोक दलवाई, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी मिश्रा, विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, कृषी अधिष्ठाता डॉ. श्यामसुंदर माने, शिक्षण विस्तार संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुरेंद्र काळबांडे व डॉ. देवानंद पंचभाई आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

कृषी क्षेत्रात शेतकऱ्यांना तत्काळ फायदेशीर असणाऱ्या उल्लेखनीय संशोधनासाठी दरवर्षी विद्यापीठातील शास्त्रज्ञांची तज्ज्ञ निवड समितीद्वारे संशोधन सादरीकरणाच्या माध्यमातून या पुरस्कारासाठी निवड करते.

‘कापूस पिकाचे उत्पादन वाढविण्यासाठी ठिबक सिंचन व कापूस पिक संरचना व्यवस्थापन’ या विषयावरील नावीन्यपूर्ण व शेतकऱ्यांसाठी फायदेशीर संशोधनासाठी डॉ. काकडे यांना रोख रक्कम तसेच प्रशस्तीपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले.

विदर्भाच्या पांढऱ्या सोन्याचे उत्पादन वाढविण्यासाठी नावीन्यपूर्ण संकल्पना राबवत शेतकऱ्यांची आर्थिक मिळकत वाढविण्यासाठी भरीव कार्य करण्याचे त्यांचे मार्गदर्शन शेतकरी व विद्यापीठ हिताचे ठरले आहे.

त्यांनी केलेल्या कापूस पिक संरचना या विषयावरील शिफारशीत तंत्रज्ञानामुळे कापूस पिकाचे २० टक्क्यांपर्यंत उत्पादन वाढल्याचे सिद्ध केले आहे व सदर तंत्रज्ञानास २०२४ च्या महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठाच्या संयुक्त संशोधन सभेमध्ये मान्यता मिळाली असून हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sharad Pawar Meets PM Modi: शरद पवार, सुप्रिया सुळेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, अचानक भेटीमुळे राजकीय वतुर्ळात चर्चा, नेमकं कारण काय?

Modern Fruit Plantation: फळझाडे लागवडीसाठी आधुनिक यंत्रे

Agriculture Machinery: जुन्या रिक्षा इंजिनापासून बहुउपयोगी कृषी यंत्र

Enterotoxemia In Goats: पावसाळ्यात शेळ्या-मेंढ्यांमध्ये आंत्रविषाराचा धोका, वेळीच करा प्रतिबंध

Jowar Procurement Scam: हमीभावाने ज्वारी खरेदीमध्ये गैरव्यवहार

SCROLL FOR NEXT