Jalna Sowing Update Agrowon
ॲग्रो विशेष

Jalna Sowing Update : पेरणीची घाई नको, आपत्कालीन पीक व्यवस्थापन करा

Agriculture Officer : गेवराई बाजार (ता. बदनापूर) येथे कृषी संजीवनी सप्ताह कार्यक्रम जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.

Team Agrowon

Jalna News : पाऊस पडला की लगेच पेरणीची घाई न करता पीक पद्धतीमध्ये बदल, वाणांची निवड, बीजप्रक्रिया, एकात्मिक अन्नद्रव्य, तण, पाणी, कीड आणि रोग व्यवस्थापन या पंचसूत्रीचा अवलंबून एकात्मिक पीक व्यवस्थापन करावे, असा सल्ला बदनापूर कृषी विज्ञान केंद्राच्या विषय विशेषज्ञ कृषिविद्या डॉ. दीपाली कांबळे यांनी दिला.

गेवराई बाजार (ता. बदनापूर) येथे कृषी संजीवनी सप्ताह कार्यक्रम जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. यामध्ये विषय विशेषज्ञ कृषिविद्या, डॉ. कांबळे यांनी आपत्कालीन पीक व्यवस्थापन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

मंडळ कृषी अधिकारी श्री. सरोदे यांनी महिलांचा शेती क्षेत्रामधील योगदानाबद्दल माहिती दिली. कृषी सहायक श्री. वांढेकर यांनी कॉटन स्मार्ट या योजनेबद्दल सविस्तर चर्चा केली. या वेळी प्रदीप पाटील, गावचे प्रथम नागरिक सरपंच रणजित चव्हाण तसेच समस्त गेवराई बाजार ग्रामस्थ यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT