Farmer Loan Wavier Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Loan waiver : कर्जमाफीला घाबरता काय, धाडस करा; मुंगटीवारांचा सरकारला घरचा आहेर

Budget Session 2025 : मागील दोन दिवस अर्थसंकल्पावरील चर्चेत विरोधी पक्षांच्या आमदारांनी सरकारला धारेवर धरलं आहे. लाडकी बहीण, शेतकरी कर्जमाफी आणि शक्तिपीठवरून सत्ताधाऱ्यांवर टिका करण्यात आली. त्यातच मुंगटीवार यांनी सरकारला शेतकरी कर्जमाफीवरून घरचा आहेर दिल्याचं पाहायला मिळालं.

Dhananjay Sanap

Farmer Karjmafi : भाजीमध्ये मीठ कमी टाकून काटकसर होत नसते. शेतकरी कर्जमुक्तीची डेअरिंग करा, अशी मागणी करत भाजपचे आमदार सुधीर मुंगटीवार यांनी महायुती सरकारला घरचा आहेर दिला. ते विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बुधवारी (ता.१२) बोलत होते. यावेळी मुंगटीवारांनी राज्य सरकारसमोर आरसा धरला. त्यामुळे सत्ताधारी महायुतीची पंचायत झाल्याचं पाहायला मिळालं.

मुंगटीवार म्हणाले, "शक्तिपीठ महामार्ग झाला पाहिजे. त्यासाठी ८६ हजार कोटींच्या निधीची घोषणा केली. पण त्यापूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी का घाबरता, या कर्जमाफीसाठी २० हजार कोटी रुपये लागणार आहेत. धाडस दाखवा." असंही मुंगटीवार म्हणाले.

मागील दोन दिवस अर्थसंकल्पावरील चर्चेत विरोधी पक्षांच्या आमदारांनी सरकारला धारेवर धरलं आहे. लाडकी बहीण, शेतकरी कर्जमाफी आणि शक्तिपीठवरून सत्ताधाऱ्यांवर टिका करण्यात आली. त्यातच मुंगटीवार यांनी सरकारला शेतकरी कर्जमाफीवरून घरचा आहेर दिल्याचं पाहायला मिळालं.

मुंगटीवारांनी शेतकरी कर्जमाफीसाठी धाडस करताना कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होणारा खर्च आणि निवृत्ती वेतन वाढीवरही टिपणी केली. मुंगटीवार म्हणाले, "शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला २० हजार कोटी रुपयांची गरज आहे. धाडस दाखवा. कर्मचारी वेतन आणि निवृत्ती वेतनावरील वाढीसाठी एक वर्षात ३० हजार कोटी खर्च करतो. मग शेतकरी कर्जमाफी करण्यास अडचण काय असा सवाल मुंगटीवारांनी उपस्थित केला.

यावेळी मुंगटीवार यांनी मंत्रीपद न मिळाल्याने नाराज नसल्याच स्पष्ट केलं. तसेच मी काहीही बोललो की, हे म्हणतात मंत्री केलं नाही म्हणून नाराज आहे. परंतु असं काही नाही. मी पदासाठी निवडणूक लढवत नाही. तर जनतेच्या सेवेसाठी निवडणून आलो आहे, असं म्हणत 'तुझसे नाराज नही जिंदगी हैराण हूं मै' या हिंदी गाण्याच्या ओळी मुंगटीवार यांनी गाऊन दाखवल्या.

दरम्यान, राज्य सरकार अर्थसंकल्पात कर्जमाफीचा निर्णय घेईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. परंतु अर्थमंत्री अजित पवारांनी कर्जमाफीबद्दल ब्र देखील उच्चारला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित

Waste Management: कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेली व्यवस्था

Paddy Nursery Update: भाताच्या ५८६१ हेक्टरवर रोपवाटिका

Free Seed Distribution: दुबार पेरणीसाठी मोफत बियाणे : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Farm Loan Waiver: तीस जुलैपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी : कृषिमंत्री भरणे

SCROLL FOR NEXT