Onion Subsidy Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Subsidy : ‘कांदा अनुदानासाठी कागदपत्रांची खात्री तसेच पूर्तता करावी’

Sinner Market Committee : सिन्नर बाजार समितीमधील कांदा अनुदान तपासणी कामकाज अंतिम टप्प्यात आले आहे. शेतकऱ्यांनी १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत कांदा बाजार समितीमध्ये विक्री केलेला आहे.

Team Agrowon

Nashik Onion News : सिन्नर बाजार समितीमधील कांदा अनुदान तपासणी कामकाज अंतिम टप्प्यात आले आहे. शेतकऱ्यांनी १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत कांदा बाजार समितीमध्ये विक्री केलेला आहे. त्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ३५० रुपयांप्रमाणे अनुदान जाहीर केले आहे.

या कालावधीत ज्या शेतकऱ्यांनी कांदा विक्री केला व शासनाच्या अनुदानाकरिता बाजार समितीकडे अर्ज सादर केला आहे, अशा शेतकऱ्यांनी कांदा अनुदान योजनेतील लाभासाठी कागदपत्रांची खात्री तसेच अपूर्ण असलेल्या अर्जांची पूर्तता करावी, असे आवाहन सिन्नर बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांनी सादर केलेल्या अर्जासोबत कांदा विक्रीची मूळ पावती जोडलेली नाही किंवा कांदा पिकाची नोंद असलेला सात-बारा उतारा जोडलेला नाही. उताऱ्यावर कांदा पिकाची नोंद आपल्याचे खाते क्रमांकासमोर नाही.

तसेच ज्या शेतकऱ्यांनी काटापट्टी जोडलेली नाही, अशा शेतकऱ्यांनी त्वरित बाजार समितीशी संपर्क साधून कांदा अनुदान प्रस्तावातील त्रुटींची पूर्तता करून द्यावी. तसेच ज्या प्रस्तावाला कांदा विक्री पावत्या मुलाच्या किंवा इतर कुटुंबीयांच्या नावे व सात-बारा उतारा कुटुंबातील इतर व्यक्तीच्या नावे आहे.

अशा शेतकऱ्यांनी आपण प्रस्तावासोबत संमतीपत्र जोडले नसल्याचे दिसून आले आहे. तरी तत्काळ संमतीपत्र जोडून देण्यात यावे. त्याचप्रमाणे जोडलेल्या संमतीपत्रावर स्वाक्षरी नसल्यास बाजार समितीशी तत्काळ संपर्क साधून पूर्तता करण्यात यावी, असे सभापती डॉ. रवींद्र पवार, उपसभापती सिंधुबाई कोकाटे व सचिव विजय विखे यांनी कळविले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dr Kumar Saptarshi Tribute: डॉ. सप्तर्षींचा विचार अखंडपणे जपणे गरजेचेच शरद पवार यांचे आवाहन

Drone Pilot Training MOU: ड्रोन पायलट प्रशिक्षणासाठी ‘वनामकृवि’चा ‘सारथी’सोबत करार

Goat Deformity Case: गौंडगाव येथील बोकडामध्ये दिसली दुर्मीळ नैसर्गिक विकृती; पशुवैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञाकंडून तपासणी

Uddhav Thackeray: अंधभक्तांविरोधात देशभक्त जिंकले : उद्धव ठाकरे

Women Farmers Empowerment Council: राज्यात महिला शेतकरी सक्षमीकरण परिषद स्थापन

SCROLL FOR NEXT