Red Radish Agrowon
ॲग्रो विशेष

Red Radish : तुम्हाला लाल मुळा माहिती आहे का?

पांढऱ्या मुळ्याची चव तुम्ही चाखली असेल, पण फार कमी लोकांनी लाल मुळा खाल्ला असेल. लाल मुळ्यात सामान्य मुळ्यापेक्षा जास्त अँटिऑक्सिडंट्स आढळतात.

Team Agrowon

पांढऱ्या मुळ्याची चव तुम्ही चाखली असेल, पण फार कमी लोकांनी लाल मुळा खाल्ला असेल. लाल मुळ्यात सामान्य मुळ्यापेक्षा जास्त अँटिऑक्सिडंट्स आढळतात.  लाल मुळ्यात (Red Radish ) पेलार्गोनिडिन नावाचे अँथोसायनिन असते, त्यामुळे त्याचा रंग लाल होतो. लाल मुळ्याचा वापर सॅलडमध्ये केला जातो.  भारतात कुठेही याची लागवड करता येते. मात्र, त्याची किंमत पांढऱ्या मुळ्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. जाणून घेऊयात.

लाल मुळ्याची लागवड कशी केली जाते. 

लाल मुळ्याची लागवडीसाठी डिसेंबर ते फेब्रुवारी हा महिना अतिशय योग्य मानला जातो.  लागवडीसाठी निचरा होणारी जमिन उत्तम मानली जाते. जमिनीचा सामू ५ ते ७.५ च्या दरम्यान असावा लागतो. याशिवाय वालुकामय जमिनीतही लागवड करता येते.  लाल मुळ्याची लागवड बियांची पेरणी करुन किंवा नर्सरीत रोपे वाढवूनही करता येते. पेरणीसाठी सुमारे ८ ते १० किलो बियाणे लागते. व्यावसायिक लागवडीसाठी रोपवाटिक वाढवलेल्या सुधारित वाणांची निवड करावी. पेरणीनंतर साधारण २० ते ४० दिवस लागतात.  एकरी ५४ क्विंटलपर्यंतचे उत्पादन मिळू शकते.  

कमी खर्चात अधिक नफा

लाल मुळ्याची योग्य व्यवस्थापन करुन चांगला नफा मिळवता येतो. कमी शेतकऱ्यांकडून त्याची लागवड होत असल्यामुळे लाल मुळा अजूनही बाजारात क्वचितच मिळतो. शेतकऱ्यांनी लागवड केल्यास त्यांना सामान्य मुळ्यापेक्षा अधिक नफा मिळू शकतो. सर्वसाधारणपणे पांढऱ्या मुळ्याला बाजारात जास्तीत जास्त ५० रुपये किलोपर्यंत भाव मिळू शकतो. एक किलो लाल मुळ्याचा भाव ५०० ते ८०० रुपये किलोपर्यंत पोहोचतो. अशा परिस्थितीत कमी खर्चात अधिक नफा मिळू शकतो. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chana Farmer Registration: हरभरा नोंदणीला शेतकऱ्यांचा अत्यल्प प्रतिसाद

Livestock Farmers Crisis: पशुपालकांवर कर्जाचा डोंगर

Pandharpur Corridor Project: ‘कॉरिडॅार’ रद्दसाठी दुचाकी रॅली

Drinking Water Scarcity: ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी धडपड

Wheat Prices: प्रमुख बाजारांत गव्हाच्या आवकेत वाढ; दर दबावात

SCROLL FOR NEXT