Amaravati DCC Bank Agrowon
ॲग्रो विशेष

District Cooperative Bank : बनावट प्रोसिडिंगच्या आधारे जिल्हा बँकेने बनविले ११०५ सभासद

District Bank Update : जिल्हा बँकेने धोरणात्मक निर्णयात बदल न करता बनावट प्रोसिडिंगच्या आधारे सत्ताधाऱ्यांच्या गटातील नातलगांना बँकेत स्थान देत ११०५ जणांना सभासद केले आहे.

Team Agrowon

Amravati News : जिल्हा बँकेने धोरणात्मक निर्णयात बदल न करता बनावट प्रोसिडिंगच्या आधारे सत्ताधाऱ्यांच्या गटातील नातलगांना बँकेत स्थान देत ११०५ जणांना सभासद केल्याचा गंभीर आरोप बँकेच्या सत्ताधारी गटातील संचालक रवींद्र गायगोले यांनी केला आहे.

जिल्हा बँकेच्या विविध शाखांमध्ये काही दिवसांपूर्वी डीडी काढण्याचा प्रकार उघडकीस आला होता. तेव्हा सभासद वाढवीत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व सीईओंनी हा आरोप फेटाळून लावला होता, असेही ते म्हणाले.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सभासद वाढवीत असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी सुरू झाली होती. बँकेच्या विविध शाखांवर १०५० रुपयांचा डीडी काढण्यासाठी गर्दी देखील झाली होती. रात्री उशिरापर्यंत डीडी काढण्यासाठी बँकेत तारांबळ उडाली होती. त्यानुसार दहा हजार नागरिकांनी डीडी काढले होते.

इतक्या नागरिकांना सभासदत्व देता येणार नसल्याने अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह सत्ताधारी गटातील पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या विश्वासातील तसेच बँकेच्या कार्यक्षेत्राबाहेरील नातलगांना बँकेत स्थान देत ११०५ नवे सभासद करून घेतले आहेत.

याबाबत श्री. गायगोले यांनी लेखी तक्रार केली होती. विशेष म्हणजे १७ सप्टेंबर २०२२ रोजी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने एक पत्र जारी केले. त्या पत्रामध्ये मूळ सभासद संख्येमध्ये वाढ करता येणार नसल्याचे स्पष्ट केले होते.

असे असतानाही बँकेने मागच्या तारखेमध्ये खोट्या प्रोसिडिंगच्या आधारे ११०५ नवीन सभासद करून घेतल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. तसे पुरावेही त्यांनी दिले आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची तक्रार त्यांनी सहकार आयुक्तांकडेही केली आहे.

अशा प्रकारे नियमबाह्य पद्धतीने जर बँकेची सभासदसंख्या वाढविली जात असेल तर बँकेवर त्याचा मोठा भविष्यकालीन परिणाम होईल. या संपूर्ण प्रकरणांमध्ये सहकार विभागाची भूमिका सुद्धा संशयास्पद आहे. सहकार आयुक्तांनी यापूर्वी जारी केलेल्या आदेशाप्रमाणे मूळ सभासद संख्या वाढवता येणार नसल्याचे स्पष्ट केले. जवळच्या व्यक्तींना नियमबाह्य पद्धतीने सभासदत्व देण्यात आले आहे.
रवींद्र गायगोले, संचालक, जिल्हा बँक.

बँकेच्या उपविधीप्रमाणे आम्ही सभासद केले आहेत. त्यामध्ये कुठेही अवास्तव सदस्य केलेले नाहीत. - अभिजित ढेपे, उपाध्यक्ष, जिल्हा बँक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon 2026 In Kerala : मॉन्सूनचं २६ मे रोजी केरळात होणार आगमन; हवामानशास्त्र विभागाचा अंदाज

Monsoon Arrival 2026: माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान; मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात ५ दिवस पावसाची शक्यता

MSP Hike 2026: शेतीमालांच्या हमीभावाची वाढ अत्यंत तोकडी

Khat Dukan Karvai: : कृषी विभागाकडून १९ निविष्ठा केंद्रांवर सिंधुदुर्गात कारवाई

Onion Procurement: केंद्राकडून राज्यात १२ रुपये ३५ पैशानं कांद्याची खरेदी सुरु, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

SCROLL FOR NEXT