Employment Generation  Agrowon
ॲग्रो विशेष

CM Employment Scheme : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत यंदा १९०० लाभार्थ्यांचे उद्दिष्ट

Employment Generation : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेत २०२४-२५ मध्ये जिल्ह्याने दिलेल्या उद्दिष्टाच्या १०५ टक्के कामगिरी केली आहे.

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेत २०२४-२५ मध्ये जिल्ह्याने दिलेल्या उद्दिष्टाच्या १०५ टक्के कामगिरी केली आहे. ९८३ उद्दिष्ट असतांना १०१५ नवयुवकांना स्वयंरोजगारासाठी अर्थसाह्य उपलब्ध करून दिले आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात जिल्ह्यासाठी योजनेअंतर्गत १९०० कर्ज प्रस्तावाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

यासंदर्भात मंगळवारी (ता. ३) जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेत आढावा घेण्यात आला. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक स्वप्नील राठोड, जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक प्रेषित मोघे, बॅंक ऑफ महाराष्ट्रचे अजित मुंडे, बॅंक ऑफ इंडियाचे संतोष वैद्य, पंजाब नॅशनल बॅंकेचे नितीन काळे, पंजाब ॲण्ड सिंध बॅंकेचे रत्नगोपाल सुर्वे, महाराष्ट्र ग्रामिण बॅंकेचे दिनेश कल्हापुरे आदी उपस्थित होते.

गत वर्षी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बॅंकांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही शासनाचा महत्त्वाकांक्षी योजना आहे.

स्वयंरोजगार व रोजगारनिर्मितीला याद्वारे चालना दिली जाते. या योजनेचा लाभ देतांना लाभार्थ्यांना वारंवार हेलपाटे मारावे लागू नये याची जिल्हा उद्योग केंद्र व बॅंकांनी खबरदारी घ्यावी. आवश्यक सर्व दाखले, कागदपत्रांची पूर्तता करुन घ्यावी.

जिल्ह्यातील १०१५ नव उद्योजकांनी उभारले उद्योग

२०२४-२५ या एका वर्षात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत (सीएमईजीपी) विविध बँकेमार्फत कर्ज उपलब्ध करून १०१५ जणांनी उद्योग उभारले आहेत.या योजनेअंतर्गत एकूण ७६ कोटी ६८ लाख ४३ हजार रुपयांच्या एकूण कर्ज प्रस्तावांना मान्यता मिळून ते जिल्हा उद्योग केंद्रामार्फत २३ कोटी २७ लाख ८३ हजार रुपयांच्या अनुदानास ते पात्र ठरले. गेल्या वर्षात जिल्ह्याने १०३ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Crop Insurance: ‘त्या’ केळी विमाधारकांकडून खुलासे मागविणार

Banana Crop Insurance: बारड मंडळातील ३३९ केळी उत्पादकांना परतावा मंजूर

Agrowon Podcast: कांद्याचा भाव दबावातच; कापूस भाव स्थिर, मका आवक स्थिर, तूर स्थिरावली तर पपईच्या भावात उठाव

Avakali Paus: अवकाळी पावसाचा इशारा! फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी करा तातडीचे व्यवस्थापन

Tapi Mega Recharge Project: तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाला चालना केव्हा?

SCROLL FOR NEXT