Agriculture Department Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Awards : राज्याच्या कृषी पुरस्कारांचे आज मुंबईत वितरण

Agriculture Minister Dhananjay Munde : कृषी पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आज (ता. २९) सायं. ५ वा. मुंबई येथील नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया (डोम) वरळी येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

Team Agrowon

Mumbai News : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती, संस्था तसेच अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात येणाऱ्या कृषी पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आज (ता. २९) सायं. ५ वा. मुंबई येथील नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया (डोम) वरळी येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

कोविड तसेच विविध कारणांमुळे प्रलंबित असलेले राज्यातील सन २०२०, २०२१ व २०२२ या तीन वर्षांतील एकूण ४४८ पुरस्कार राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री धनंजय मुंडे, रोजगार हमी मंत्री दादा भुसे, मुंबईचे पालकमंत्री व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

या कार्यक्रमांमध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार (१), वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार (८), जिजामाता कृषी भूषण पुरस्कार(८), कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार (८), वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार (८), उद्यान पंडित पुरस्कार(८), वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (४०), पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषिसेवा रत्न पुरस्कार (१०), युवा शेतकरी पुरस्कार(८), अन्नधान्य, कडधान्य व गळीत धान्य पिकांच्या राज्यांतर्गत पीक स्पर्धा योजनेतील पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे.

कृषी पुरस्कारांच्या रकमेत कृषिमंत्री मुंडे यांनी ४ पट इतकी घसघशीत वाढ करण्याचा निर्णय फेब्रुवारी २०२४ मध्ये घेतला होता. तसेच पुरस्कार विजेत्यांना उपस्थित राहण्यासाठी दैनिक प्रवास भत्ता रकमेत सुद्धा वाढ करण्यात आली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indian Economy : अर्थव्यवस्थेत पहिल्या तिमाहीत ७.८ टक्के वाढ; शेतीचं चित्र पावसावर अवलंबून

Plant Nutrition: अन्नद्रव्ये पिकांना कशी मिळतात?

Chickens Breeding Management: ब्रीडर कोंबड्यांचे प्रजनन व्यवस्थापन

Tribal Farmer Relief: वनपट्टेधारक आदिवासी शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफी, महसूलमंत्री बावनकुळेंची माहिती

Chakan Livestock Market: नावारूपाला आलेला चाकणचा जनावरांचा बाजार

SCROLL FOR NEXT