Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : नाशिक जिल्ह्यात पीकविमा योजनेची १०० कोटींहून अधिक भरपाई वाटप

Crop Damage Compensation : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा १७ वा हप्ता देताना जिल्ह्यातील सव्वा चार लाखांहून अधिक शेतकऱ्यांना जवळपास ८९ कोटी एवढा निधी वितरित करण्यात आला आहे.

Team Agrowon

Nashik News : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा १७ वा हप्ता देताना जिल्ह्यातील सव्वा चार लाखांहून अधिक शेतकऱ्यांना जवळपास ८९ कोटी एवढा निधी वितरित करण्यात आला आहे.

जवळपास ५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर साधारण ४९७ कोटी ९१ लाख रुपयांची रक्कम डीबीटीमार्फत जमा करण्यात आली आहे. पंतप्रधान पीकविमा योजनेतून आजअखेर पावणेदोन लाखहून अधिक लाभार्थींना शंभर कोटी रुपयांहून अधिक नुकसान भरपाईवाटप करण्यात आली, अशी माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली.

भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालय येथे मुख्य शासकीय ध्वजवंदन भुसे यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते.

या वेळी खासदार राजाभाऊ वाजे, आमदार सीमा हिरे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) विक्रम देशमाने, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, उपायुक्त मंजिरी मनोलकर, उपायुक्त राणी ताटे आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.

भुसे म्हणाले, की राज्य शासनाच्या विविध शासकीय योजनांचा लाभ जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने नियोजन करण्यात येत आहे. त्याचबरोबर अनेक नवीन संकल्पना राबवून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कार्यरत असून त्यांचे काम अभिनंदनीय आहे. तसेच शासनाने समाजातील सर्व घटक केंद्रीत करून त्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

Crop Insurance Compensation: हवामान मापक यंत्रावरील नोंदणी ग्राह्य धरून पीकविमा परतावा द्या : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Railway Protest: रेल्वेचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; संगमनेरकरांचा इशारा

Weekly Weather: महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT