Dhananjay Munde  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Inputs : मूल्यसाखळी योजनेतील निविष्ठा तातडीने वितरित करा

Dhananjay Munde : फवारणी पंप, नॅनो युरिया, डीएपी वितरणावरून सध्या मंत्री कार्यालय आणि प्रशासनात तणावाचे वातावरण आहे.

बाळासाहेब पाटील

Mumbai News : ‘‘कापूस, सोयाबीन आणि तेलबिया मूल्यसाखळी विकास योजनेंतर्गत देण्यात येणारे फवारणी पंप हंगाम संपत आला तरी पडून का आहेत?, लाभार्थ्यांना अजून का वाटप केले नाही, असे विचारत तातडीने ही योजना मार्गी लावावी,’’ असे निर्देश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.

फवारणी पंप, नॅनो युरिया, डीएपी वितरणावरून सध्या मंत्री कार्यालय आणि प्रशासनात तणावाचे वातावरण आहे. आजारपणातून बरे झाल्यानंतर कृषिमंत्री मुंडे यांनी पहिलीच बैठक घेत या योजनेच्या दिरंगाईबाबत प्रशासनाला जाब विचारला.

बैठकीस कृषी विभागाच्या अप्पर मुख्य सचिव व्ही. राधा, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचे प्रकल्प संचालक परिमल सिंह, बाळासाहेब ठाकरे ग्रामीण कृषी विकास प्रकल्पाचे संचालक हेमंत वसेकर, कृषी संचालक विनयकुमार आवटे, सर्व विभागीय कृषी सहसंचालक, अधीक्षक कृषी अधिकारी, प्रकल्प संचालक आत्मा व इतर अधिकारी उपस्थित होते.

राज्यात ९९ टक्के पेरण्या पूर्ण झालेल्या असल्यामुळे शासनाच्या विविध योजनांद्वारे महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना द्यावयाची कृषी पूरक उपकरणे, निविष्ठा यांचे वितरण त्वरित करावे.

नॅनो युरिया, डीएपी, पॉवर स्प्रे पंप, स्टोरेज बॅग, मेटल दिहाईड आदी साहित्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे, असे निर्देश कृषिमंत्र्यांनी दिले. तसेच विविध योजनांच्या अंमलबजावणीत येणाऱ्या व प्रत्यक्ष शेतकऱ्यांना भासणाऱ्या अडचणींबाबत आढावा घेण्यात आला. तसेच या योजनेतील शेतकऱ्यांना तातडीने निविष्ठांचे वाटप करावे, असे निर्देश देण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Rainfall: पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

MKCL Investment: ‘एमकेसीएल’ने सरकारमध्ये गुंतवणूक करावी; शरद पवार यांची अपेक्षा

Market License Cancellation: पणन संचालकांचा खासगी बाजारांवर कारवाईचा धडाका; ‘रामेश्वर, ‘कसमादे’, ‘जय गजानन’ बाजारांचे परवाने रद्द

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT