Onion Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Rate : कांदाभावामुळे शेतकऱ्यांत असंतोष

Kanda Bazar Bhav : एकीकडे कांद्याला भाव नाही अन् दुसरीकडे चाळीत साठवलेला कांदा खराब होऊ लागल्याने शेतकऱ्यांची ‘इकडे आड-तिकडे विहीर’ अशी अवस्था झाली आहे.

Team Agrowon

Onion Rate In Devala : एकीकडे कांद्याला भाव नाही अन् दुसरीकडे चाळीत साठवलेला कांदा खराब होऊ लागल्याने शेतकऱ्यांची ‘इकडे आड-तिकडे विहीर’ अशी अवस्था झाली आहे.

यामुळे कांदा भाववाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या कांदा उत्पादकांना नाइलाजाने कांदा विक्रीसाठी बाजारात काढावा लागत आहे. त्यात कांद्याला अत्यल्प भाव मिळत असल्याने शेतकरी वर्गात तीव्र असंतोष असून, आंदोलनांचा भडका उडू लागला आहे.

नामपूर, करंजाड, चांदवड, सटाणा, डांगसौंदाणे, देवळा आदी ठिकाणी कांद्याला मिळत असलेल्या कमी भावामुळे रास्ता रोको करत आंदोलने होत आहेत.

यामुळे सत्ताधारी सरकारने शेतकऱ्यांच्या या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, अन्यथा पुढील काळात मोठे आंदोलन होण्याची शक्यता आहे.

कांदा फेकण्याच्या खर्चाची भर

अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील कांदा प्रंचड प्रमाणात खराब झाला. तशाही परिस्थितीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी अवाच्या सव्वा खर्च करून कांदा काढून चाळीत साठवला. परंतु, एक-दीड महिन्यातच चाळीतला कांदा सडू लागला आहे. असा खराब कांदा तो पावड्याने उचलून फेकण्याची वेळ आली आहे.

विठेवाडी शिवारातील धनंजय बोरसे यांनी एप्रिल महिन्यात साठवणूक केलेला कांदा असाच फावडे लावून फेकण्याची वेळ आली आहे. कांद्याचा पैसा तर झालाच नाही, उलट कांदा बाहेर काढून फेकण्याचा त्यांचा खर्च वाढल्याने ते हताश आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Protest : तात्काळ मदतीची मागणी! दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांचे उद्यापासून बेमुदत उपोषण

Soybean Seed Storage : सोयाबीन बियाणे सुरक्षित ठेवण्यासाठी कृषी तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला

Turmeric Crops : हळद उत्पादक शेतकरी हवालदिल! करप्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे हळद पीक आले अडचणीत

Amravati Teachers Constituency : अमरावती शिक्षक निवडणूक: शिक्षकांच्या मतांवर कोणाचा ताबा? मतविभाजन ठरणार निर्णायक

FFS App Fertilizer Booking : खत खरेदी आता झाली डिजिटल; २२ तारखेपासून घरबसल्या करा ऑनलाईन बुकिंग

SCROLL FOR NEXT