Koyana Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Koyana Dam: कोयनेच्या पायथा वीजगृहातून पाण्याचा विसर्ग

धरणाच्या पाणीसाठ्यात (Water Storage)२४ तासांत तब्बल ४.७० टीएमसीने वाढ झाली आहे. धरणात जलपातळी नियंत्रित करण्यासाठी बुधवारी धरणाचा पायथा वीजगृह कार्यान्‍वित करून धरणातून नदीपात्रात एक हजार ५० क्यूसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

अॅग्रोवन वृत्तसेवा

सातारा : कोयना धरण (Koyana Dam) पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडत सुरू आहे. धरणाच्या पाणीसाठ्यात २४ तासांत तब्बल ४.७० टीएमसीने वाढ झाली आहे. धरणात जलपातळी नियंत्रित करण्यासाठी बुधवारी धरणाचा पायथा वीजगृह कार्यान्‍वित करून धरणातून नदीपात्रात एक हजार ५० क्यूसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. सध्या धरणात ४३.१८ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. तसेच, जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातही पावसाचा जोर कायम असल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे.

कोयना धरण परिसरात आठवड्यापासून जोरदार पाऊस (Heavy Rain) सुरू आहे. गुरुवारी (ता. १४) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे ११२, नवजात १२१, तर महाबळेश्वरला २७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

पाणलोट क्षेत्रात (Catchment Area) बुधवारी पावसाचा जोर दुप्पट वाढला असून, धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत होती. धरणाची जलपातळी नियंत्रित राहण्यासाठी बुधवारी पाच वाजता पायथा वीज गृहातून एक हजार ५० क्यूसेसने पाणी सोडण्यात आले. गुरुवारी पाण्याचा विसर्ग कायम ठेवण्यात आला आहे. या विसर्गामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने नदीकाठाच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

जिल्ह्याच्या इतर भागातही पावसाचा जोर कायम असून गुरुवारी (ता. १४) सकाळी आठपर्यंत सरासरी ३७.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पश्‍चिमेकडील महाबळेश्‍वर, जावळी, पाटण, सातारा, वाई, कऱ्हाड तसेच पूर्वेकडील खंडाळा, कोरेगाव या तालुक्यांत पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे अनेक ठिकाणची पिके पाण्याखाली गेली आहेत. दुष्काळी माण, खटाव, फलटण तालुक्यांतही काही ठिकाणी पाऊस पडला आहे.

तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये

सातारा- ४६.३, जावळी- ७४.५, पाटण-५१.२, कराड- १९.९, कोरेगाव-२७.२, खटाव-१४.९, माण- ९.१, फलटण- १०.०, खंडाळा- २६.०, वाई-३२.५, महाबळेश्वर-१७०.९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT