Almatti Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Almatti Dam Water Release: अलमट्टी धरणातून ७० हजार क्युसेकने विसर्ग सुरू

Heavy Rain Alert: पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे कृष्णा नदी (कल्लोल बॅरेज) आणि घटप्रभा नदी (लोलासूर पूल) येथून पाण्याचा विसर्ग वाढला आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News: पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे कृष्णा नदी (कल्लोल बॅरेज) आणि घटप्रभा नदी (लोलासूर पूल) येथून पाण्याचा विसर्ग वाढला आहे. त्यामुळे अलमट्टी धरणाकडे प्रवाह वाढण्याची शक्यता असल्याने कृष्णा नदीकडे जाणारा प्रवाह बुधवारी (ता. १८) ५० हजार क्युसेकवरून ७० हजार क्युसेक इतका केला आहे. त्यामुळे अलमट्टी धरण क्षेत्रातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अलमट्टी धरण प्रशासनाकडून देण्यात आली आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली.

गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे कृष्णा आणि वारणा नदीसह पंचगंगेच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे कृष्णा नदी (कल्लोल बॅरेज) आणि घटप्रभा नदी (लोलासूर पूल) येथेही पाणीपातळी वाढली आहे.

अलमट्टी धरणात ६८.३४ टीएमसी म्हणजे ५६ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. २९ मे रोजी धरणात ४५.९५ टीएमसी इतका पाणीसाठा होता. अर्थात, वीस ते बावीस दिवसांत २२.३९ टीएमसीने वाढला आहे. कृष्णा नदी (कल्लोल बॅरेज) आणि घटप्रभा नदी (लोलासूर पूल) येथेही पाणीपातळी वाढली आहे.

सद्यःस्थितीला हिप्परगी बॅरेज येथे ७९८०० क्युसेकने पाण्याची आवक सुरू असून, ७९०५० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर अलमट्टी धरणात ८००८४ क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. धरणातून ७० हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या दोन्ही विभागांशी संवाद सुरू केला असून संभाव्य पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आतापासून पाणी सोडण्याचे नियोजन केले असल्याचे सांगली पाटबंधारे विभागाने सांगितले आहे. दरम्यान, अलमट्टीतून ७० हजार क्युसेकने विसर्ग सुरू असल्याने धरण क्षेत्राच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. एकंदर पाऊस आणि पाण्याची आवक यावर पाण्याचा विसर्ग कमी अधिक केला जाईल, असेही सांगण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Devendra Fadnavis On Ajit Pawar: 'मित्रशोक आपल्या अंतस्थ आत्म्यालाही जाळतो', अजितदादांच्या आठवणींनी मुख्यमंत्री फडणवीस भावूक

Agriculture Advisory: ढगाळ हवामान; किमान, कमाल तापमानात वाढ शक्य

Carbon Farming: कार्बन शेती : शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा नवा मार्ग

Sugarcane Workers: मजुरांचे तांडे परतीच्या वाटेवर; शिवार पुन्हा गजबजणार

Maharashtra Unseasonal Rain: विदर्भ, मराठवाडा, कोकणला अवकाळीचा तडाखा, गहू, हरभरा पिकाचे नुकसान

SCROLL FOR NEXT