Agriculture Department Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Department : कृषी संचालकांना सकाळी पदोन्नती, संध्याकळी सेवानिवृत्ती

Agriculture Promotion : गेल्या काही वर्षांपासून कृषी विभागात पदोन्नती देण्यात येत आहे. ही पदोन्नती सकाळी दिली जात असून संध्याकाळी तो अधिकारी सेवानिवृत्त होत असल्याने संचालकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : गेल्या काही वर्षांपासून कृषी विभागात पदोन्नती देण्यात येत आहे. ही पदोन्नती सकाळी दिली जात असून संध्याकाळी तो अधिकारी सेवानिवृत्त होत असल्याने संचालकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

२८ फेब्रुवारी रोजी शासनाने कृषी विभागातील किसन मुळे, अशोक किरनाळी, अंकुश माने या तीन अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आल्याचे आदेश उपसचिव प्रफुल्ल ठाकूर यांनी काढले होते. त्यातील किसन मुळे या संचालकांना पदोन्नतीच्या दिवशी सेवानिवृत्ती घेण्यात आली.

कृषी विभागातील श्री. किरनाळी आणि किसन मुळे यांची सहसंचालक पदावर तीन वर्षे पूर्ण होत नव्हते तरीही संचालकपदी संधी देण्याच्या उद्देशाने १४ ऑक्टोबर २०२४ रोजी शासन आदेशान्वये कृषी संचालक संवर्गातील श्रेणी अवनत केलेल्या आत्माच्या संचालक पदावर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात आली होती.

तर अशोक मुळे यांची महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळ या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर श्री. किरनाळी आणि किसन मुळे यांना २८ फेब्रुवारी रोजी सदर पद श्रेणी उन्नत करून पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली. तर ठाणे विभागातील विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांची अकोला येथील महाराष्ट्र राज्य बीज प्रमाणीकरण यंत्रणा येथे रिक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

कृषी विभाग हा मागील काही वर्षांपासून पदोन्नती, बदल्या, रिक्त पदे आणि वारंवार पुढे येणारे गैरव्यवहार यामुळे सतत चर्चेत येत आहे. त्यातच कृषी विभागाविषयी अधिकाऱ्यामध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

यापूर्वी डी. एल. जाधव, काशिनाथ तरकसे या अधिकाऱ्यांनाही सेवानिवृत्तीच्या दिवशी पदोन्नती देण्यात आली होती. तर माजी संचालक असलेल्या मच्छिंद्र घोलप यांना अखेरच्या चार ते पाच दिवस बाकी असताना पदोन्नती देण्यात आली होती. त्यामुळे शेवटच्या दिवशी पदोन्नती देण्यात येत असलेल्या अधिकाऱ्यामध्ये ही प्रथा पडत असल्याकारणाने अधिकाऱ्यामध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar Water Crisis: अहिल्यानगर जिल्ह्यात टँकरची संख्या १०७ वर

Irrigation Project Benefits: टेंभू, म्हैसाळमुळे २३०० हेक्टर क्षेत्र झाले हिरवेगार

Tur Cultivation: खानदेशात तूर लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल; क्षेत्रवाढीची शक्यता

Rural Regional Development: सोलापूर जिल्ह्यात आणखी एक आकांक्षित तालुका

Land Acquisition Protest: रिंग रोड भूसंपादनासंदर्भात शेतकऱ्यांचा संताप

SCROLL FOR NEXT