Jaykwadi Water Issue  Agrowon
ॲग्रो विशेष

Chandoli Water Issue : चांदोलीच्या पाण्यासंदर्भात आंदोलनाची दिशा बदलणार

Irrigation Department : येत्या २९ फेब्रुवारीपर्यंत चांदोलीच्या पाण्यासंदर्भात पाटबंधारे विभागाने अहवाल पाठवून जलसंपदा मंत्री यांच्यासमवेत बैठक न लागल्यास आंदोलक वारणा धरणावर जाऊन धरणाच्या पाण्याला भेटणार आहेत.

Team Agrowon

Sangli News : येत्या २९ फेब्रुवारीपर्यंत चांदोलीच्या पाण्यासंदर्भात पाटबंधारे विभागाने अहवाल पाठवून जलसंपदा मंत्री यांच्यासमवेत बैठक न लागल्यास आंदोलक वारणा धरणावर जाऊन धरणाच्या पाण्याला भेटणार आहेत. त्यातून आचारसंहितेपर्यंत काही न झाल्यास मतदान बटण दाबायचे का नाही, हे ठरविणार असा इशारा डॉ. श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी दिला.

मणदूर (ता. शिराळा) येथे सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनात ते बोलत होते. या वेळी आमदार मानसिंगराव नाईक, माजी सभापती हणमंतराव पाटील, पाणी संघर्ष चळवळीचे निमंत्रक वसंत पाटील, ‘विश्वास’चे संचालक शिवाजी पाटील, शंकर मोहिते उदय पाटील, बाळासाहेब माने, तानाजी पाटील, संदीप पाटील, सचिन मोरे आदी प्रमुख उपस्थित होते.

डॉ. पाटणकर म्हणाले, ‘‘गुढे पाचगणी पठारावर पाणी, उपसा योजना आणि सूक्ष्म सिंचनासह अन्य मागण्यांसंदर्भात मंत्रालयात लाभक्षेत्र सचिव यांच्या बैठकीत ठरले. अहवाल आराखडा शासनाला पाठवायचे निश्चित झाले होते. पाटबंधारे विभागाने अहवाल वेळेत पाठवावा, अशी आमची अपेक्षा आहे.

२९ फेब्रुवारीपर्यंत वाट पाहणार नाही तर आंदोलनाची दिशा बदलावी लागणार.’’आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले, ‘‘पाणी उपलब्ध आहे तर राजकारण बाजूला ठेवून सर्वपक्षीय एकत्रित मिळून तुमच्या समवेत राहून काम करणार होत. येत्या अधिवेशनात पहिल्या दिवशी मुद्दा मांडणार.’’

या वेळी विजय पाटील, सुरेश पाटील श्रमिक मुक्ती दलाचे सदस्य सखाराम पाटील, युवराज नाईक, सदाजी पाटील, शिवाजी पाटील, आनंदा लोहार, ए. एन. पाटील उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Krushi Anudan: नांदेडमध्ये कृषी यांत्रिकीकरणातून १२.७० कोटींचे अनुदान वितरित

Raju Shetti: बोगस आणि निकृष्ट खते, कीडनाशकांमुळे आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान, राजू शेट्टींकडून कारवाईची मागणी

Maharashtra Khat Satha: खरिपासाठी १.५० लाख टन युरिया, २५ हजार टन डीएपीचा संरक्षित साठा

Pani Tanchai Upay: पाणी टंचाईवर मात करत पेणच्या शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

Bhat Sheti in Maharashtra: सूर्या प्रकल्पामुळे उन्हाळी भातशेती बहरली

SCROLL FOR NEXT