Agristack Yojana Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer ID : ‘फार्मर आयडी’ला बीड जिल्ह्यात मिळेना गती

Agriculture Scheme : शेतकरी ओळखपत्र ही एक डिजिटल ओळख प्रणाली आहे, जी शेतकऱ्याचे आधार कार्ड त्याच्या जमिनीच्या नोंदींसोबत जोडते.

Team Agrowon

Beed News : केंद्र सरकारच्या ‘ॲग्रिस्टॅक’ प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांसाठी तयार होणारा ‘फार्मर आयडी’ आता १५ एप्रिलपासून सर्व कृषी योजनांसाठी बंधनकारक करण्यात आला आहे. यानुसार पीएम किसान सन्मान निधी, पीकविमा, खत-बियाण्याचे अनुदान यासारख्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांचा फार्मर आयडी असणे आवश्यक आहे.

मात्र, बीड जिल्ह्यात अद्याप पर्यंत केवळ ५७.८१ टक्के शेतकऱ्यांनीच नोंदणी पूर्ण केली असून, उर्वरित शेतकरी या प्रक्रियेत सहभागी झालेले नाहीत. एकूण ६.२९ लाख खातेदारांपैकी केवळ ३.६३ लाख शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार झाले आहेत. शेतकरी ओळखपत्र ही एक डिजिटल ओळख प्रणाली आहे, जी शेतकऱ्याचे आधार कार्ड त्याच्या जमिनीच्या नोंदींसोबत जोडते.

यामुळे सरकारकडे शेतकऱ्याची जमीन, पिके, पशुधन, कर्ज, अनुदाने यांची एकत्रित माहिती उपलब्ध होते. ही प्रणाली केंद्र सरकारच्या डिजिटल कृषी अभियानाचा भाग आहे.शेतकऱ्यांसाठी हा फार्मर आयडी पुढील काळात एक महत्त्वाचा दस्तऐवज ठरणार आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपली नोंदणी वेळेत पूर्ण करून शेतकरी ओळखपत्र मिळवणे अत्यंत गरजेचे आहे.

जिल्ह्यात मात्र या उपक्रमाला शेतकऱ्यांचा संमिश्र प्रतिसाद मिळत असून जिल्ह्यातील एकूण ६ लाख २९ हजार २६४ शेतकऱ्यांपैकी ३ लाख ६३ हजार ७६१ शेतकऱ्यांची नोंदणी झालेली आहे. म्हणजेच आत्ता पर्यंत केवळ ५७.८१ टक्के शेतकऱ्यांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवला आहे. ता. १५ एप्रिल पासून शासनाने शेतकऱ्यांना फार्मर आयडी बंधनकारक केला असून हा क्रमांक नसेल तर शेतीविषयक योजनांना मुकावे लागणार आहे.

बीड, आष्टी आघाडीवर...

तालुकानिहाय नोंदणी पाहता बीड, आष्टी, गेवराई आणि माजलगाव या तालुक्यामध्ये नोंदणीसाठी शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मात्र वडवणी, पाटोदा, शिरूर कासार, परळी, केज, अंबाजोगाई या तालुक्यांची फार्मर आयडी नोंदणीची आकडेवारी अद्याप ही ५० टक्क्यांच्या आत असून या तालुक्यात शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. प्रशासनाकडून शेतकऱ्यांना सातत्याने फार्मर आयडी कार्डची नोंदणी करून घेण्याचे आवाहन केले जात असून तलाठी, कृषी सहायक किंवा सीएससी केंद्रातून नोंदणी पूर्ण करू शकतात.

शेतकऱ्यांना वेळेत नोंदणी करण्याचे आवाहन आम्ही सातत्याने करत आहोत. तसेच शेतकऱ्यांची नोंदणी वाढवण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. ज्या शेतकऱ्यांची नोंदणी अद्याप झाली नाही त्यांनी त्वरीत तलाठी, कृषी सहायक किंवा सीएससी केंद्रात जाऊन फार्मर आयडी तयार करून घ्यावा. अन्यथा योजनांपासून वंचित राहावे लागेल.
- शिवकुमार स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी, बीड.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT