Orchards plantation Agrowon
ॲग्रो विशेष

Orchard Plantation : पाणी नसल्यामुळे फळबाग लागवडीत खोडा

Horticulture : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यात २०२३-२४ मध्ये १ हजार ५०० हेक्टरवर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट आहे.

Team Agrowon

Parbhani News : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यात २०२३-२४ मध्ये १ हजार ५०० हेक्टरवर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट आहे. सोमवारपर्यंत (ता.८) जिल्ह्यात २७३ लाभार्थी शेतकऱ्यांनी २५८.८४ हेक्टरवर फळबाग लागवड केली आहे. जिल्ह्यात गत वर्षी मोसमी पाऊस कमी झाल्यामुळे सिंचनासाठी पाणी नसल्यामुळे फळबाग लागवडीचे उद्दिष्ट गाठणे अशक्य दिसत आहे.

जिल्ह्यात २०२३ मध्ये मोसमी पावसाचे आगमन उशिरा झाले. जून, जुलै, ऑगस्ट महिन्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. जुलै, ऑगस्ट महिन्यात दीर्घ खंड पडला. जून ते ऑक्टोबर या पर्यंतच्या (वार्षिक) पावसाची सरासरी ८३८.९० मिलिमीटर आहे. परंतु प्रत्यक्षात ५२३.५ मिलिमीटर (६२.४० टक्के) पाऊस झाला असून ३१५.४ मिलिमीटर पावसाची तूट झाली आहे.

नोव्हेंबर महिना अखेरीस मान्सून्नोत्तर पाऊस झाला. लघू, मध्यम, मोठ्या प्रकल्पांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत अत्यंत कमी पाणीसाठा आहे. सिंचनासाठी पाणी नसल्यामुळे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजना तसेच इतर योजनेतील फळबाग लागवड करणे शेतकऱ्यांना शक्य नाही. उपलब्ध पाण्यावर काही शेतकऱ्यांनी फळबाग लागवड केली आहे.

परंतु त्यांच्यापुढे येत्या पावसाळ्यापर्यंत फळबागा जिवंत ठेवण्याचे आव्हान आहे. २०२३-२४ यावर्षी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यात १ हजार ५०० हेक्टर उद्दिष्ट आहे.

जिल्ह्यातील २ हजार ६०२ शेतकऱ्यांनी २ हजार ३१८ हेक्टरवर फळबाग लागवडीसाठी अर्ज केले होते. त्यापैकी २ हजार ५८० लाभार्थींना २ हजार २७१ हेक्टरवर फळबाग लागवडीसाठी मंजुरी दिली होती. त्यापैकी २६० हेक्टरवर फळबाग लागवडीसाठी खड्डे खोदले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT