ZP Dharashiv Agrowon
ॲग्रो विशेष

ZP Dharashiv : धाराशिव ‘झेडपी’चा २४ कोटींचा अर्थसंकल्प सादर

Dharashiv ZP Budget : जिल्हा परिषदेचे स्वउत्पन्न, पाणीपुरवठा देखभाल व दुरुस्ती निधीचे आणि पंचायत समितीच्या स्वनिधीच्या २०२३-२४ वर्षाच्या सुधारित अंदाजपत्रकास व सन २०२४-२५च्या मुळ अंदाजपत्रकास सभेत मंजुरी देण्यात आली आहे.

Team Agrowon

Dharashiv News : चालू आर्थिक वर्षासाठी २४ कोटी ४९ लाख खर्चाचे स्व-उत्पन्नाचे अंदाजपत्रक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत सादर केले. शिक्षण, आरोग्य, महिला बाल कल्याण व दिव्यांगाचे कल्याण यावर भर देणारे हे अंदाजपत्रक असल्याचे सांगण्यात येत आहे.

जिल्हा परिषदेचे स्वउत्पन्न, पाणीपुरवठा देखभाल व दुरुस्ती निधीचे आणि पंचायत समितीच्या स्वनिधीच्या २०२३-२४ वर्षाच्या सुधारित अंदाजपत्रकास व सन २०२४-२५च्या मुळ अंदाजपत्रकास सभेत मंजुरी देण्यात आली आहे.

हा अर्थसंकल्प मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन इगे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनक घोष यांचेकडे सुपूर्द केला. डॉ. घोष यांनी सर्वसाधारण सभेसमोर मांडला व त्यास मंजुरी प्रदान केली.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ, उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्रीकांत मोरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं) श्याम गोडभरले, कार्यकारी अभियंता, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास, उपमुख्य कार्यकारी अधिकारी देवदत्त गिरी, डॉ. यतीन पुजारी उपस्थित होते.

कोणासाठी किती तरतूद

बांधकाम : ५ कोटी २ लाख ३४ हजार (२९.५१ टक्के), पंचायतराज : ३ कोटी ५५ लाख ७७ हजार १८७ (१४.५३), पाणीपुरवठा व स्वच्छता : ३ कोटी ३० लाख २ हजार (१३.४७), आरोग्य : २ कोटी १५ लाख ६ हजार (८.७८), शिक्षण : २ कोटी ३ लाख ७३ हजार (८.३२), कृषी : १ कोटी ५४ लाख ३८ हजार (६.३०), महिला बाल कल्याण : १ कोटी ५१ लाख १५ हजार (६.१७), मार्ग व पूल : १ कोटी ४७ लाख ४० हजार (६.०२), लघु पाटबंधारे : १ कोटी २५ लाख १६ हजार (५.११), पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय : १ कोटी ८ लाख ८ हजार (४.४१), समाज कल्याण : ७७ लाख, दिव्यांग कल्याण : ५८ लाख ४ हजार, वनीकरण : १ लाख अशी तरतूद करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Laxman Hake: ओबीसींच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली, तरीही लक्ष्मण हाके मुंबईकडे जाण्यावर ठाम

Chemical Fertilizer Efficiency: विविध उपायांद्वारे वाढवा रासायनिक खतांची कार्यक्षमता

National Common Mobility Card: एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अनिवार्य; महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाचा निर्णय

Madgyal Sheep Breed: ओळख माडग्याळ मेंढीची...

Sericulture Farming: रेशीम शेतीतून अर्थकारणाला गती

SCROLL FOR NEXT