Pandharpur Wari Agrowon
ॲग्रो विशेष

Pandharpur Wari 2024 : राज्यभरातून पंढरपुरात वारकऱ्यांची मांदियाळी

Kartiki Wari : कार्तिकी वारीचा मुख्य सोहळा मंगळवारी (ता. ११) होत असून, श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध भागांतून वारकरी आणि दिंड्यांसह सुमारे तीन लाखांहून अधिक वारकरी पंढरीत दाखल झाले आहेत.

सुदर्शन सुतार

Solapur News : कार्तिकी वारीचा मुख्य सोहळा मंगळवारी (ता. ११) होत असून, श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध भागांतून वारकरी आणि दिंड्यांसह सुमारे तीन लाखांहून अधिक वारकरी पंढरीत दाखल झाले आहेत. टाळमृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषाने अवघी पंढरी दुमदुमून गेली आहे.

आषाढी आणि कार्तिकी या दोन मोठ्या वाऱ्या समजल्या जातात. आषाढी वारीप्रमाणेच मोठी गर्दी कार्तिकीला असते. आषाढी वारीचा मुख्य सोहळा उद्या होत असून, पहाटे अडीच वाजता श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा होणार आहे. दरवर्षी आषाढीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि कार्तिकीला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा करण्याची परंपरा आहे. पण आता विधानसभा निवडणूक आचारसंहिता असल्याने त्या नियोजनात बदल करण्यात आला आहे.

या वारीसाठी कोकण, मराठवाड्यातून काही दिंड्या येतात, या दिंड्यांसह गेल्या दोन दिवसांपासून पंढरपुरात वारकऱ्यांची गर्दी वरचेवर वाढते आहे, सोमवारी (ता. ११) दशमीच्या स्नानासाठी मोठ्या संख्येने वारकरी पंढरीत दाखल झाले. प्रत्यक्ष दर्शनरांगेत सुमारे एक लाखापर्यंत वारकरी उभे होते. सोमवारी दर्शनरांग गोपाळपूर रस्त्याच्याही पुढे गेली. साधारण ३ लाखांहून अधिक वारकरी पंढरीत आजच आल्याचा अंदाज आहे.

शहरातील नदीकाठचा ६५ एकर परिसर, मंदिर प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा नदीचे वाळवंट, भक्तनिवास या परिसरात वारकऱ्यांची सर्वाधिक गर्दी झाल्याचे चित्र होते. दशमीच्या चंद्रभागेतील स्नानाला विशेष महत्त्व असल्याने सोमवारी वारकऱ्यांची स्नानासाठी नदीवर झुंबड पाहायला मिळाली. त्याशिवाय शहरातील विविध मठ, धर्मशाळा, मंदिरांमध्ये भजन, कीर्तन, प्रवचने रंगली आहेत. सर्वत्र हरिनामाच्या जयघोषाने पंढरी दुमदुमली आहे.

दर्शनाला लागतायेत १० ते १२ तास

वारीच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीने या आधीच २४ तास मुखदर्शन आणि २२ तास पदस्पर्श दर्शन खुले ठेवले आहे. त्यामुळे या दोन्हीही दर्शनरांगात सातत्याने गर्दी होत आहे. आजही जवळपास दर्शनासाठी १० ते १२ तास लागत होते. तर प्रतिमिनिटाला ३० ते ३५ वारकरी दर्शन करून बाहेर पडत होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mobile Slaughterhouses : अरुणाचल सरकार देणार मोबाइल स्लॉटर हाउसला प्रोत्साहन

Climate Change : हवामान बदलावर विचारमंथन करणारी ‘कॉप’

Jaggery Production Kolhapur : गुळाला भाव मिळतोय पण आवक घटली; गूळ उत्पादनावर विधानसभा निवडणुकीचा परिणाम

Pomegranate Farming : यंदा दोन्ही बहरांचे नियोजन करतोय!

Agriculture Warehouse : शास्त्रशुद्ध पद्धतीने गोदाम उभारणी

SCROLL FOR NEXT