Rural Development  Agrowon
ॲग्रो विशेष

Rural Development : ‘तीर्थक्षेत्र विकासची कामे पुढील महिन्यात सुरू करा’

दोन्ही तीर्थक्षेत्र विकास आराखडे त्वरित अंतिम करून जिल्हाधिकाऱ्यांना दाखविण्यात यावे.

Team Agrowon

Washim News : संत सेवालाल महाराज पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकास आराखडा आणि पोहरादेवी आणि उमरी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांचे अंदाजपत्रके तयार करण्याचे आणि निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम या महिन्यात पूर्ण करून पुढील महिन्यात कोणत्याही परिस्थितीत दोन्ही आराखड्यांतील कामे सुरू करावीत, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड (Minister Sanjay Rathod) यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आराखड्यांचा आढावा आयोजित सभेत श्री. राठोड बोलत होते. जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, उपवनसंरक्षक अभिजित वायकोस उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. राठोड पुढे म्हणाले, की दोन्ही तीर्थक्षेत्र विकास आराखडे त्वरित अंतिम करून जिल्हाधिकाऱ्यांना दाखविण्यात यावे. आराखडे तयार करताना दूरदृष्टीने त्यामध्ये वाहन पार्किंग, पिण्याचे पाणी व विद्युत व्यवस्थांचा समावेश करावा.

आराखड्यातील कामांचे व्यवस्थापन व स्वच्छता कायम राहील याबाबतचा देखील आराखड्यात समावेश करावा.

दोन्ही विकास आराखड्यासाठी जी शासकीय जमीन अधिग्रहीत करण्यात येणार आहे, त्यावर असलेली अतिक्रमणे त्वरित हटवून जागा खुली करण्यात यावी. असेही ते म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rice Crop Update: पावसाची उघडीप; भात पिके वाढीच्या अवस्थेत

Farmer Loan Waiver: वनपट्टाधारक, वारसांना मिळणार कर्जमाफी

Potato Crop Damage: पावसाअभावी बटाटा पीक करपले; पंचनाम्यांची मागणी

Ganesh Festival: गणरायाचे उत्साहात आगमन

Silk Farming: ‘सॉइल टू सिल्क’मधून मूल्यसाखळी उभारणी

SCROLL FOR NEXT