Jayakwadi Dam Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Jayakwadi Dam : ‘जायकवाडी’त पाणी सोडण्यासाठी तीव्र जनआंदोलनाचा निर्धार

Jayakwadi Water Issue : जायकवाडी धरणात हक्काचे ८.६ टीएमसी सोडण्यात यावे. या प्रमुख मागणीसाठी गुरुवारी (ता. १६) परभणी येथे विविध पक्षांतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले.

Team Agrowon

Parbhani News : यंदा परभणी जिल्ह्यात अपुऱ्या पावसामुळे दुष्काळी स्थिती उद्भवली आहे. जायकवाडी डाव्या कालव्यद्वारे रब्बी हंगामात चार व उन्हाळी हंगामात चार आवर्तने सोडण्यासाठी वरच्या धरणातून जायकवाडी धरणात हक्काचे ८.६ टीएमसी सोडण्यात यावे.

या प्रमुख मागणीसाठी गुरुवारी (ता. १६) परभणी येथे विविध पक्षांतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. येत्या आठ दिवसांत पाणी सोडण्यात यावे अन्यथा या प्रकरणी सरकारला जाब विचारण्यासाठी एकजुटीने तीव्र जनआंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

खासदार संजय जाधव, आमदार सुरेश वरपुडकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय गव्हाणे, जायकवाडी पाणी हक्क संघर्ष समितीचे निमंत्रक राजन क्षीरसागर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ घुले, विलास बाबर, विश्वनाथ थोरे, गंगाप्रसाद आणेराव, अमोल जाधव, रामभाऊ घाडगे, बाळासाहेब रेंगे, सोनाली देशमुख आदी उपस्थित होते.

जाधव म्हणाले, की सरकारला परभणी जिल्ह्यातील दुष्काळाचे गांभीर्य नाही. जायकवाडीच्या पाण्यासाठी तीव्र संघर्ष करावा लागणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांची एकजूट आवश्यक आहे. क्षीरसागर म्हणाले, की अगोदर जायकवाडी धरण ६५ टक्के भरण्याची हमी द्यावी. मगच वरच्या धरणात पाणी आडवा.

कालवे दुरुस्त नाहीत. मराठवाड्यातील धरणांची हेळसांड सुरू आहे. वरपुडकर म्हणाले, की गोदावरी पाटबंधारे मंडळाच्या ठिकाणी आंदोलन केले तर प्रभावी होईल. परभणी जिल्ह्यातील दुष्काळ प्रश्नी आंदोलन तीव्र आंदोलन करण्यात येईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT