Water Conservation Agrowon
ॲग्रो विशेष

Galmukt Dharan Yojana : गाळ काढण्याची योजना रुतली गाळातच

Slit-Free Dam Scheme : गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत गतवर्षी आठ गावांच्या तलावातील गाळ काढण्यास मंजुरी मिळाली होती.

Team Agrowon

Solapur News : गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत गतवर्षी आठ गावांच्या तलावातील गाळ काढण्यास मंजुरी मिळाली होती. परंतु एकही काम झाले नाही. यावर्षी चार कामांना मंजुरी आहे, परंतु अद्याप कामे सुरू नसल्याने गाळ काढण्याची योजना अद्यापही गाळातच रुतल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

तालुक्यात अनेक पाझर तलाव व गाव तलाव आहेत; परंतु या तलावांमध्ये गाळाचे प्रमाण अधिक झाल्याने या तलावांची पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे. पाऊस होऊन तलाव भरून देखील क्षमतेएवढे पाणी साठले जात नाही. त्यामुळे उन्हाळ्यापूर्वीच पाण्याची कमतरता भासत आहे.

यासाठी या तलावातील गाळ काढून या तलावांची पाणी साठवण क्षमता वाढावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. तसेच काढण्यात येणारा गाळ हा शेतकऱ्यांना आपल्या शेतात टाकता येणार असल्याने त्यांच्या जमिनीचा कस वाढणार आहे.

गतवर्षी कारुंडे नं. १, गारवाड (नाथाचे तळ), जळभावी (तांबूळवडा), तरंगफळ (पठाण खोरं), भांब (भोपळदरा), बचेरी नं. १, कोथळे नं. ३ या सात गावांतील पाझर तलावातील तर पिरळे येथील गाव तलावातील गाळ काढण्याच्या कामाला मंजुरी मिळाली होती; परंतु एकही काम झाले नाही.

यावर्षी जळभावी, कारुंडे, पिरळे व कोथळे या गावांतील तलावांमधील गाळ काढण्याच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. या प्रत्येक कामासाठी संस्थांची नेमणूक करण्यात आली आहे. परंतु अद्याप याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे यावर्षीही ही योजना राबविली जाणार की नाही, याबाबत संभ्रमावस्था असून अद्याप गाळ काढण्याची योजना गाळातच असल्याचे स्पष्ट आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Maharashtra 2026 : दुष्काळाच्या स्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Maharashtra Cabinet Decisions: साखर कारखाने, ऊस शेतकऱ्यांना दिलासा; ७५० कोटींच्या सॉफ्ट लोन धोरणाला मंजुरी, मुख्यमंत्र्यांची माहिती

Dam Water Storage Update: यावल, रावेरातील प्रमुख सिंचन प्रकल्प भरले

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT